युक्रेनच्या संकटामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत.
देशांतर्गत शेअर बाजारातील (Share Market) घसरण बुधवारी सलग सहाव्या दिवशीही सुरू राहिली आणि बीएसई सेन्सेक्स (Sensex) 68.62 अंकांनी घसरला. युक्रेनच्या संकटामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. 30 शेअर्सचा सेन्सेक्स 68.62 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 57,232.06 वर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (Nifty) (निफ्टी 50) 28.95 अंकांनी अर्थात 0.12 टक्क्यांनी घसरून 17,063.25 वर आला
एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे दोन्ही निर्देशांक इतर आशियाई बाजारांप्रमाणेच बहुतेक वेळा सकारात्मक कॅटेगरीमध्ये राहिले. कारण युक्रेनच्या सीमेजवळ रशियन लष्करी हालचालींनंतर रशियावर पाश्चात्य निर्बंधांमुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची कठोर भूमिका काही प्रमाणात का होईना पण नरम होईल आणि युद्धाची भीती दूर होईल अशी गुंतवणूकदारांना आशा होती. पण तसं घडलच नाही. एनटीपीसी, एल अँड टी, नेस्ले आणि आयसीआयसीआय बँक सेन्सेक्स शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
जागतिक बाजारपेठेची स्थिती
आशियातील बहुतांश बाजार नफ्यात राहिले. याचे कारण म्हणजे अमेरिका, जपान आणि युरोपीय देशांना रशियावर निर्बंध लादल्यामुळे युद्धाची भीती टळण्याची अपेक्षा आहे. रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागात आपले सैन्य पाठवल्याने तणाव वाढल्याने मंगळवारी अमेरिकन शेअर बाजाराला तोटा सहन करावा लागला. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यातील दोन भागांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोव यांच्यासोबत या आठवड्यात होणारी बैठक रद्द केली. लावरोव यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले.
कच्चे तेलाच्या किमतीत घट
दरम्यान, जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स किंचित कमी होऊन $96.74 प्रति बॅरल झाला. मंगळवारी ते 99.50 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी 3,245.52 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, असे स्टॉक एक्सचेंजच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार समजत आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स ?
- कोटक बँक (KOTAKBANK)
- टायटन (TITAN)
- इंडसइंड बँक (INDUSINDBANK)
- टाटा काँझ्युमर्स (TARACONSUME)
- मारुती (MARUTI)
- गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
- भारत फोर्ज (BHARATFORG)
- भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)
- ग्रामीण विद्युकरण निगम लिमिटेड (RECLTD)
- एयू बँक (AUBANK)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.