share market esakal
अर्थविश्व

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण!

आज बाजाराची स्थिती कशी असेल?

शिल्पा गुजर

आज बाजाराची स्थिती कशी असेल ?

सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. सोमवारी जवळपास सर्वच क्षेत्रात कमजोरी दिसून आली. मात्र, PSU बँकांनी चांगली कामगिरी केली. पॉवर शेअर्समध्येही काही खरेदी दिसून आली. बॉन्ड यील्ड आणि क्रूडच्या किमतीत झालेली वाढ यांचा शेअर बाजारावर (Share Market) परिणाम दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स (Sensex) 1,023.63 अंकांनी अर्थात 1.75 टक्क्यांनी घसरून 57,621.19 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 302.70 अंकांनी अर्थात 1.73 टक्क्यांनी घसरून 17,213.60 वर बंद झाला.

पॉवर, मेटल वगळता सर्व क्षेत्रातील निर्देशांक घसरले. बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तूंचे शेअर्स सर्वाधिक घसरले. IT, Auto, FMCG, Realty 1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. निफ्टीच्या 50 पैकी 42 शेअर्समध्ये घसरण झाली तर सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्स घसरले. दुसरीकडे, निफ्टी बँकेच्या 12 पैकी 8 शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसला.

आज बाजाराची स्थिती कशी असेल ?

निफ्टी 17400 वर रझिस्टेंस असल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. जोपर्यंत तो या पातळीच्या खाली राहील. तोपर्यंत बाजारात कमजोरी दिसून येईल. खाली, निफ्टीला 17000 वर सपोर्ट दिसतो.

आवरली चार्टवर नेगिटीव्ह क्रॉस ओव्हरसह निर्देशांक 21*50-HMA च्या खाली व्यापार करत असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. जे निफ्टीमध्ये कमजोरीचे संकेत देत आहे. याशिवाय स्टोकास्टिक आणि MACD सारखे डेली मोमेंटम इंडिकेटरदेखील नेगिटीव्ह क्रॉसओव्हरसह ट्रेड करत आहेत जे कमकुवतपणाचे लक्षण असल्याचे ते म्हणाले. निफ्टीला 17000 वर सपोर्ट आहे तर 17500 वर रेझिस्टन्स आहे. बँक निफ्टीला 37400 आणि 39000 वर रेझिस्टन्स आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- पॉवर ग्रीड (POWERGRID)

- ओएनजीसी (ONGC)

- टाटा स्टील (TATASTEEL)

- एनटीपीसी (NTPC)

- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

- गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

- गुजरात गॅस लिमिटेड (GUJGASLTD)

- महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स (M&MFIN)

- फेडरल बँक (FEDERALBANK)

- एसआरएफ लिमिटेड (SRF)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT