Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market : येत्या काळात 'या' शेअर्समधून मिळेल चांगला परतावा

विविध गुंतवणूक सल्लागारांची मत जाणून घेऊयात...

सुमित बागुल

मुंबई : गेल्या आठवड्यात निफ्टी 16,700 आणि सेन्सेक्स 56,000 या विक्रमी उच्चांकापर्यंत पोहोचले. त्यानंतर जागतीक बाजारपेठ कमजोर होण्याची चिन्हं आणि कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळं बाजार कोसळला आणि 20 ऑगस्टला सेन्सेक्स 0.2 टक्क्यांखाली बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 0.5 टक्क्यांनी घसरुन बंद झाला. परंतू, येत्या काळात शेअर बाजार कसा राहिल आणि यातून कोणत्या शेअर्समधून चांगल्या परताव्याची शक्यता आहे जाणून घेऊयात.

LKP Securities च्या रोहित सिंगरे गुंतवणुकीबाबत सल्ला देतात....

  • Britannia Industries :

    शेअरमध्ये 4,200 ते 4,400 रुपयांचे लक्ष्य आहे. त्यामुळं 3,600 रुपयांवर स्टॉपलॉस लावावा. यात 3 ते 4 आठवड्यात 7.8 टक्के ते 12.9 टक्के वाढ बघायला मिळेल.

  • Lux Industries :

    या शेअरची 4,350 ते 4,450 रुपयांच्या लक्ष्यासाठी 3,900 रुपयांवर स्टॉपलॉस लावत खरेदी करावी. 3 ते 4 आठवड्यात 5 टक्के ते 7.4 टक्के वाढ पहायला मिळेल.

  • Tata Power :

    या शेअरमध्ये 135 रुपयांच्या लक्ष्यासोबत 120 रुपयांवर स्टॉपलॉस लावावा. 3 ते 4 आठवड्यात 7 टक्के वाढ बाघायला मिळेल.

  • Power Finance Corporation :

    हा शेअर 130 ते 135 रुपयांच्या लक्ष्यासाठी 122 रुपयांवर स्टॉपलॉस लावत खरेदी करावी. 3 ते 4 आठवड्यात 4.5 ते 8.5 टक्के वाढ पाहायला मिळू शकेल.

  • Tata Elxsi :

    हा शेअर 5,100 ते 5,300 रुपयांच्या लक्ष्यासाठी 4,400 रुपयांच्या स्टॉपलॉसवर खरेदी करायचा सल्ला दिला आहे. 3 ते 4 आठवड्यात 7.8 ते 12 टक्के वाढू शकतो.

अॅक्सिस सिक्युरिटीजचे राजेश पालवीय काय म्हणतात पाहुयात...

  • Asian Paints :

    हा शेअर 3,230 ते 3,260 रुपयांच्या लक्ष्यासाठी 3,000 रुपयांवर स्टॉपलॉस लावून खरेदी करायचा सल्ला दिला आहे. 3 ते 4 आठवड्यात 3.8 ते 4.7 टक्के वाढ पहायला मिळेल.

  • Fortis Healthcare :

    हा शेअर 295 ते 308 रुपयांचे लक्ष्य ठेऊन 261 रुपयांवर स्टॉपलॉस लावत खरेदी करा. 3 ते 4 आठवड्यात 6.3 ते 11.0 टक्के वाढ होईल.

समीत चव्हाण यांच्याकडून गुंतवणूकीचा सल्ला...

  • Bata India :

    हा शेअर 1,845 रुपयांच्या लक्ष्यासाठी 1,675 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवत खरेदी करावा. 2 ते 3 आठवड्यात यामध्ये 7 टक्के वाढ बघायला मिळेल.

  • United Spirits :

    हा शेअर 764 रुपयांच्या लक्ष्यासाठी 682 रुपयांच्या स्टॉपलॉसवर खरेदी करु शकता. 2 ते 3 आठवड्यात यामध्ये 9 टक्के वाढ दिसू शकेल.

कॅपिटलवाया ग्लोबलच्या आशिष बिस्वास म्हणतात...

  • Linde India :

    हा शेअर 2,480 रुपयांच्या लक्ष्यासाठी खरेदी करावा. या शेअरमध्ये 3 ते 4 आठवड्यात 26.9 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

(नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणं नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates: अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT