Borosil Renewables esakal
अर्थविश्व

अवघ्या 18 महिन्यांत या स्टॉकने केले लाखाचे 12 लाख, आणखी तेजी येईल?

काय सांगत आहेत तज्ज्ञ जाणून घेऊयात.

शिल्पा गुजर

सध्या जगभरात विजेचे संकट असताना, बोरोसिल रिन्युएबल्स या भारतात सौर ग्लास बनवणाऱ्या एकमेव कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

Borosil Renewables: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कोणाला पैसे मिळवायचे नाहीत. त्यासाठीच आम्ही तुम्हाला वेळोवेळी मल्टीबॅगर स्टॉक बद्दल माहिती देत राहतो. आज आपण बोरोसिल रिन्युएबल्स (Borosil Renewables) बद्दल बोलत आहोत. सध्या जगभरात विजेचे संकट असताना, बोरोसिल रिन्युएबल्स (Borosil Renewables) या भारतात सौर ग्लास बनवणाऱ्या एकमेव कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्सनी गेल्या 1 महिन्यात 45 टक्के परतावा दिला आहे.

अक्षय ऊर्जेवर भर

देशातील वीज संकटामुळे या कंपनीचे शेअर्स वधारत आहेत असे शेअर बाजारातील तज्ज्ञांना वाटते आहे. सध्या गुंतवणूकदार अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू पाहत आहेत जे पर्यायी ऊर्जा स्त्रोतांसह पारंपारिक ऊर्जा बदलण्याचे काम करत आहेत.

गुंतवणूकदारांची निवड आणि आवड

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने अलीकडेच सौरऊर्जा व्यवसायासाठी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे अधिग्रहण केल्याचे शेअर बाजार तज्ज्ञ रिचा अग्रवाल यांनी सांगितले. यामुळे ग्रीन एनर्जी थीमला आता वेग आला आहे. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये येत्या काळातही तेजी राहील अशी शक्यताही रिचा यांनी वर्तवली आहे.

भरघोस परतावा

एप्रिल 2020 मध्ये, बोरोसिल रिन्युएबल्सचे शेअर्स 33.6 रुपयांपासून 1400 टक्के नफ्यासह 509.70 रुपयांपर्यंत वाढले आहेत. मात्र, गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये बोरोसिलच्या शेअर्स काहीसे घसरले आहेत, त्याच्या किंमती ऑल टाईम हायच्या 10 टक्के कमी झाल्या आहेत.

स्वस्त आयातीमुळे तोटे

स्वस्त आयातीमुळे देशात अक्षय ऊर्जा उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे देशांतर्गत कंपन्यांचे मोठे नुकसान होते. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.

गुंतवणूक कधी करावी ?

गुरुवारी बोरोसिल रिन्युएबल्सचे शेअर्स 5 टक्क्यांनी कमी झाले आणि 446.80 रुपयांवर आले. बोरोसिलच्या शेअर्सने गेल्या 1 वर्षात 333 टक्के परतावा दिला आहे. कंपनीला आपली सौर ग्लास उत्पादन क्षमता 450 टन प्रतिदिन वरून 955 टन प्रतिदिन करायची आहे. बोरोसिलचे शेअर्स वाढण्याची आशा आहे, पण सध्या हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला शेअर बाजार तज्ज्ञ देत नाहीत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT