Share Market sakal
अर्थविश्व

दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी 16 शेअर्सची लिस्ट

भारतीय ब्रोकरेज आणि रिसोर्स फर्म एंजेल वनने दिवाळीसाठी 16 शेअर्सची निवड केली आहे.

शिल्पा गुजर

भारतीय ब्रोकरेज आणि रिसोर्स फर्म एंजेल वनने दिवाळीसाठी 16 शेअर्सची निवड केली आहे.

भारतीय ब्रोकरेज आणि रिसोर्स फर्म एंजेल वनने दिवाळीसाठी 16 शेअर्सची निवड केली आहे. जे गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंग किंवा दिवाळी दरम्यान खरेदी करू इच्छितात त्यांच्यासाठी ही लिस्ट महत्त्वाची ठरेल. एंजल वनने दिवाळीच्या मुहुर्त ट्रेडिंगसाठी अशोक लेलँड (Ashok Leyland), पीआय इंडस्ट्रीज (PI Industries), एचडीएफसी बँक, फेडरल बँक, शोभा, स्टोव्ह क्राफ्ट (Stove Kraft), सफारी इंडस्ट्रीज (Safari Industries), एयू स्मॉल फायनान्स (AU Small Finance) यांची निवड केली आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील एंजल वनने निवडलेल्या स्टॉक्समध्ये अशोक लेलँड (टारगेट प्राइस 175 रुपये), सोना BLW प्रिसिस (टारगेट प्राइस 775 रुपये), रामकृष्ण फोर्जिंग्स (टारगेट प्राइस 1,545 रुपये) आणि सुप्रजित इंजिनियरिंग (टारगेट प्राइस 425 रुपये) यांचा समावेश आहे.बँकिंग क्षेत्रात, एंजेल वनने AU स्मॉल फायनान्स बँक आहे, ज्याची टारगेट प्राइस 1520 रुपये ठेवली आहे, फेडरल बँकेची टारगेट प्राइस 135 रुपये आहे, एटडीएफसी बँकेची टारगेट प्राइस 1859 रुपये, तर श्रीराम सिटी युनियनचे शेअर्स 3002 रुपयांच्या टारगेटसह खरेदी करावे असा सल्ला दिला आहे.

केमिकल सेक्टरमध्ये, ब्रोकरेजने PI इंडस्ट्रीजचा फक्त एक शेअर त्याच्या टॉप पिकमध्ये समाविष्ट केला आहे आणि 3,950 च्या टारगेट प्राइससह खरेदी करायचा सल्ला दिला आहे. एंजल वनच्या दिवाळी टॉप निवडीमधील इतर स्टॉक्समध्ये कार्बोरंडम युनिव्हर्सल (टारगेट प्राइस 1,010 रुपये), स्टोव्ह क्राफ्ट (टारगेट प्राइस 1,288 रुपये), सफारी इंडस्ट्रीज (टारगेट प्राइस 979 रुपये), शोभा (टारगेट प्राइस 950 रुपये), व्हर्लपूल इंडिया (टारगेट प्राइस 2,760 रुपये), लेमन ट्री हॉटेल (टारगेट प्राइस 64 रुपये) आणि एंबल एंटरप्राइजेज (टारगेट प्राइस 4,150 रुपये) यांचा समावेश आहे.

या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत अॅसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये (AUM)वाढ झाल्यामुळे आणि प्रोव्हिजनिंगमध्ये घट झाल्यामुळे बँकांची कमाई वाढेल आणि बँकिंग स्टॉक मार्केटचे नेतृत्व करेल असे एंजल वनने एका नोटमध्ये म्हटले आहे. विमान वाहतूक, ग्राहकोपयोगी वस्तू, हॉटेल्स, मल्टिप्लेक्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात चांगली कामगिरी होणार असल्याचेही एंजल वनने म्हटले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT