Share Market sakal
अर्थविश्व

Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

शुक्रवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

सकाळ डिजिटल टीम

शुक्रवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामुळे सेन्सेक्स 1.6 टक्के अर्थात 981 अंकांनी घसरून 59,845.29अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 1.8 टक्के अर्थात 321 अंकांनी घसरून 17,806.80 च्या पातळीवर बंद झाला.

याच्या एक दिवस आधी अमेरिकन शेअर बाजारही घसरणीसह बंद झाले होते. टेक स्टॉक्सचे वर्चस्व असलेल्या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा नॅस्डॅक निर्देशांक आर्थिक मंदीच्या वाढत्या भीतीमुळे आणि व्याजदर आणखी वाढण्याची चिन्हे यामुळे जवळपास 2 टक्क्यांनी घसरला.

भारतीय शेअर बाजारातील सर्व सेक्टरल इंडेक्स लाल चिन्हात बंद झाले. त्यात स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांचाही समावेश आहे. बाजारातील अस्थिरता मोजणारा इंडिया वीआयएक्स इंडेक्स एका दिवसापूर्वीच्या 15.2 वरून 6.4 टक्क्यांनी वाढून 16.2 वर पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

तांत्रिकदृष्ट्या निर्देशांक 50-दिवसांच्या सिंपल मूव्हिंग एव्हरेजच्या (SMA ) खाली बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. त्यामुळे विकली चार्टवर एक मोठी बियरीश कँडल तयार झाली.

हा पॅटर्न नकारात्मक असल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत निर्देशांक 18,000 च्या खाली व्यवहार करत आहे, यात करेक्शनची शक्यता आहे. याच्या खाली गेल्यास निर्देशांक 17,600-17,500 पर्यंत घसरू शकतो. दुसरीकडे, 18,000 रझिस्टंस झोन म्हणून काम करू शकते. जर 18,000 ची पातळी ब्रेक झाली तर निर्देशांक 50-दिवसांच्या एसएमए किंवा 18,150-18,200 च्या दिशेने वाढू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  1. अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  2. अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  3. हिन्दाल्को (HINDALCO)

  4. टाटा स्टील (TATASTEEL)

  5. टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  6. आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  7. एल अँड टी सर्व्हिसेस लिमिटेड (LTTS)

  8. भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  9. एबीबी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (ABB)

  10. झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT