Steel Company sakal
अर्थविश्व

Steel Company: या शेअर्समध्ये येत्या काळात आणखी तेजी, तज्ज्ञांना विश्वास…

गेल्या एक महिन्यापासून या स्टीलच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि या काळात त्यांनी गुंतवणूकदारांना सुमारे 140 टक्के परतावा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम


नारायणी स्टील लिमिटेड (Narayani Steels Ltd) ही स्मॉल कॅप कंपनी असून तिची मार्केट व्हॅल्यू 42.44 कोटी आहे. कंपनी रीबार्स, एमएस ग्रेड अँगल, फ्लॅट, स्क्वेअर, गोल, विविध आकारांचे वायर रॉड कॉइलचे उत्पादन करते. गेल्या एक महिन्यापासून नारायणी स्टीलच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि या काळात त्यांनी गुंतवणूकदारांना सुमारे 140 टक्के परतावा दिला आहे.

नारायणी स्टील्सचा शेअर नुकताच 4.99 टक्क्यांनी वाढून 38.95 रुपयांवर बंद झाला. हा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किटमध्ये दिसत आहेत, ज्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होते आहे.

गेल्या एका आठवड्यात त्याचे शेअर्स 21.34 टक्क्यांनी वधारले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात त्याच्या शेअर्सची किंमत 138.81 टक्क्यांनी वाढली आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने नारायणी स्टीलच्या शेअर्समध्ये फक्त एक महिन्यापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आत्तापर्यंत ठेवली असती तर त्या 1 लाखाटे आज 2.40 लाख रुपये झाले असते.

नारायणी स्टीलने 2022 च्या सुरुवातीपासून आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 215.13 टक्के परतावा दिला आहे. सप्टेंबर 2021 मध्ये  बीएसईवर लिस्ट झाल्यापासून, त्याचे शेअर्स आतापर्यंत 22 टक्क्यांनी वाढले आहेत.

जून तिमाहीत नारायणी स्टील्सचा निव्वळ नफा 1.30 कोटी रुपये होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला 9.72 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. जून तिमाहीत कंपनीची एकूण विक्री 198.25 टक्क्यांनी वाढून 5.10 कोटी झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1.71 कोटी होती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT