नवी दिल्ली - नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं तीन FPI अकाउंटवर बंदी घातली आहे. या तीन अकाउंटच्या माध्यमातून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 43 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. आता या कारवाईनंतर अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे. एनएसडीएलने Albula इन्व्हेस्टमेंट फंड, Cresta फंड आणि APMS इन्व्हेस्टमेंट फंड यांची खाती गोठवण्यात आली आहेत. डिपॉझिटरी वेबसाइटनुसार, ही अकाउंट 31 मे किंवा त्याआधी ही कारवाई झाली आहे.
दरम्यान, तीन कंपन्यांची खाती गोठवल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सवर मोठा परिणाम झाला आहे. अदानी एंटरप्रायजेसचे शेअर्स 15 टक्क्यांनी घसरले असून त्याची किंमत 1361.25 रुपये इतकी झाली. अदानी पोर्ट्स अँड इकॉनॉमिक झोन 14 टक्के, अदानी पॉवर 5 टक्के, अदानी ट्रान्समिशन 5 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 5 टक्के तर अदानी टोटल गॅस 5 टक्क्यांनी घसरला आहे.
अद्याप या प्रकरणावर अदाणी ग्रुपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ज्या तीन कंपन्यांची खाती गोठवण्यात आली आहेत ती मॉरिशिअसची असून सेबीमध्ये त्यांनी FPI म्हणून नोंदवण्यात आलं आहे. तीनही कंपन्यांची एकत्रित अशी अदानी एंटरप्रायजेसमध्ये 6.82 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 8.03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये 3.58 टक्के गुंतवणूक आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मालकी हक्काविषयी पुरेशी माहिती न दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. खातं गोठवल्याने या कंपन्यांना त्यांचे खात्यातील शेअर्स विकता येत नाहीत किंवा खरेदीसुद्धा करता येत नाहीत. परदेशी गुंतवणूकदारांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या डिपॉझिटरीने सांगितलं की, पीएमएलए कायद्याअंतर्गत या कंपनीचे मालकी हक्क असलेल्यांबद्दल पुरेशी माहिती न दिल्यानं ही कारवाई केली आहे. सर्वसामान्यपणे अशा कारवाईआधी ग्राहकांना नोटीस पाठवली जाते. मात्र कंपन्यांकडून कोणतंही उत्तर न मिळाल्यानं खाती गोठवण्याची कठोर कारवाई केली जाते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.