share market sakal media
अर्थविश्व

Share Market: आज कोणत्या स्टॉक्सवर लक्ष केंद्रित कराल ?

निफ्टीच्या 50 पैकी 31 शेअर्समध्ये वाढ झाली.

सकाऴ वृत्तसेवा

ऑईल गॅस, पॉवर, केमिकल, आयटी शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. फार्मा, मेटल, रिअल्टी शेअर्स दबावाखाली राहिले.

- शिल्पा गुजर

मंगळवारी शेअर बाजारात चांगले वातावरण राहिले. निफ्टी-सेन्सेक्स दिवसाच्या उच्च स्तरावर बंद झाले. दिवस संपल्यावर सेन्सेक्स 446 अंकांनी वाढून 59,745 वर तर निफ्टी 131अंकांनी चढून 17,822 वर बंद झाला. बँक निफ्टीतही खालच्या स्तरावरून 400 अंकांचा सुधार दिसून आला. ऑईल गॅस, पॉवर, केमिकल, आयटी शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. फार्मा, मेटल, रिअल्टी शेअर्स दबावाखाली राहिले. तर मंगळवारीही मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये मोठी वाढ झाली. मिड कॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर बंद झाला.

निफ्टीच्या 50 पैकी 31 शेअर्समध्ये वाढ झाली. सेन्सेक्सच्या 30 पैकी 20 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी बँकेचे 12 पैकी 8 शेअर्स वाढले. तर सेन्सेक्स 446 अंकांनी वाढून 59,745 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 131 अंकांनी चढून 17,822 वर बंद झाला. बँक निफ्टी 161 अंकांनी वाढून 37,741 वर बंद झाला. मिडकॅप 134 अंकांनी चढून 31,009 वर बंद झाला.

अमेरिकन बाजारपेठांचा कमकुवतपणा आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे मंगळवारी सुरुवातीला भारतीय बाजारात निराशा होती. पण युरोपियन बाजारातील तेजीने भारतीय बाजारात उत्साह निर्माण झाला. त्याच वेळी, चिनी अर्थव्यवस्थेच्या अडचणींमुळे इथल्या काही क्षेत्रांच्या नफ्याच्या आशेने काही शेअर्समध्ये तेजी दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे (Geojit Financial Services) विनोद नायर यांनी सांगितले.

तांत्रिक दृष्टिकोन (Technical View)

निफ्टीने डेली स्केलवर एक बुलिश कँडल तयार केली आहे, याचा अर्थ तेजी दिसून येते आहे. येत्या काळातही ही तेजी कायम राहिल याचे संकेत मिळत असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया यांनी म्हटले. निफ्टीला 17,950 -18,000 च्या दिशेने जाण्यासाठी आता 17,777 च्या वर राहावे लागेल. त्याच वेळी, 17,650 -17,580 च्या झोनमध्ये सपोर्ट दिसून येत असल्याचे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडियांनी सांगितले.

आज अर्थात बुधवारी कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

- ओनजीसी(ONGC)

- टाटा पॉवर(Tata Power)

- आदित्य बिर्ला - एफ(Aditya Birla F)

- पिरॅमल एन्टरप्रायझेस(Piramal Enter)

- आरती इंडस्ट्रीज(Aarti Ind)

- इंडसइंड बँक(IndusInd Bank)

- कोल इंडिया(Coal India)

- आयआरसीटीसी(IRCTC)

नोंद: क्रिप्टो मार्केट,शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो,शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT