शेअर बाजारात आजही तेजी दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरवातीला शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली होती. परंतु गेल्या दोन दिवसात शेअर बाजार तेजीत असल्याचे दिसून आले आहे. शेअर बाजाराची सुरवात आजही तेजीसह झाली. सेन्सेक्स 59,196.96 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 17,568.15 अंकांवर खुला झाला आहे.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
मंगळवारी मार्केटमध्ये गॅप-अप ओपनिंग होती असे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. निफ्टी 17500 च्या वर जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. पण क्लोजिंग बेसिसवर ते 17500 च्या वर टिकू शकले नाही. निफ्टीमधील 17500-17600 चा झोन खूप महत्त्वाचा आहे. या झोनभोवती पुन्हा नवीन विक्री होताला दिसेल असे ते म्हणाले. जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग बेसिसवर हा झोन ओलांडत नाही तोपर्यंत ही शक्यता निफ्टीमध्ये खाली राहील. जर निफ्टी 17500-17600 च्या झोनच्या वर टिकू शकला नाही, तर आपल्याला आणखी उतार दिसू शकतो आणि येत्या ट्रेडिंग दिवसात निफ्टी आपल्याला 17300-17200 च्या दिशेने जाताना दिसेल.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
आयटीसी (ITC)
एसबीआय लाईफ (SBILIFE)
टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)
ट्रेंट (TRENT)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)
एल अँड टी सर्व्हिसेज लिमिटेड (LTTS)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.