Share Market esakal
अर्थविश्व

Share Market: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

बँकिंग, रियल्टी, ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून आली

सकाळ डिजिटल टीम

Share Market Opening: मंगळवारी सेन्सेक्स, निफ्टी तीन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाले. सेन्सेक्स 550 अंकांनी वाढून 58 961 वर बंद झाला तर निफ्टी 175 अंकांनी वाढून 17487 वर बंद झाला. त्याच वेळी, बीएसईच्या सर्व सेक्टरल इंडेक्समध्ये वाढ दिसली. बँकिंग, रियल्टी, ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. एनर्जी, इन्फ्रा आणि आयटी शेअर्स वधारले. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी झाली.

सेन्सेक्स 550 अंकांनी वाढून 58,961 वर बंद झाला. निफ्टी 175 अंकांनी वाढून 17487 वर बंद झाला. निफ्टी बँक 398 अंकांनी वाढून 40319 वर बंद झाला. मिडकॅप 335 अंकांनी वाढून 30,908 वर बंद झाला. निफ्टीमधील 50 पैकी 39 शेअर्स वधारले. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्स वधारले. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 10 शेअर्स वधारले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

मंगळवारी मार्केटमध्ये गॅप-अप ओपनिंग होती असे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. निफ्टी 17500 च्या वर जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. पण क्लोजिंग बेसिसवर ते 17500 च्या वर टिकू शकले नाही. निफ्टीमधील 17500-17600 चा झोन खूप महत्त्वाचा आहे. या झोनभोवती पुन्हा नवीन विक्री होताला दिसेल असे ते म्हणाले. जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग बेसिसवर हा झोन ओलांडत नाही तोपर्यंत ही शक्यता निफ्टीमध्ये खाली राहील. जर निफ्टी 17500-17600 च्या झोनच्या वर टिकू शकला नाही, तर आपल्याला आणखी उतार दिसू शकतो आणि येत्या ट्रेडिंग दिवसात निफ्टी आपल्याला 17300-17200 च्या दिशेने जाताना दिसेल.

पीएसयू बँकांच्या नेतृत्वात सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्का वाढल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले. सणासुदीच्या हंगामात कॉर्पोरेट लोन सायकल आणि रिटेल लोनमुळे बँकांना मोठा आधार मिळाला. त्याचा परिणाम बिगर बँकिंग पीएसयू शेअर्सवरही दिसून आला. याशिवाय डिफेंस सेक्टरमधील अनेक सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्येही आज मोठी वाढ दिसून आली.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

आयशर मोटर्स (EICHERMOT)

आयटीसी (ITC)

एसबीआय लाईफ (SBILIFE)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

ट्रेंट (TRENT)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)

एल अँड टी सर्व्हिसेज लिमिटेड (LTTS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान नसतं तर निवडणूक आयोगच नसतं' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT