share marketing latest news google
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम, सेन्सेक्स निफ्टी घसरला

शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 60 अंकांची घसरण

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात विक्रीचा जोर सुरूच आहे. शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही घसरण पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 60 अंकांची घसरण दिसून आली तर निफ्टीमध्ये 22 अंकांची वाढ दिसून आली. आज सेन्सेक्स 0.11 टक्क्यांच्या तेजीसह 59,388 वर सुरू झाला तर निफ्टी 0.12 टक्क्यांच्या तेजीसह 17,696 वर सुरू झाला आहे. आज शेअर बाजारातील 27 शेअरमध्ये चांगली तेजी असून 22 शेअर घसरणीसह व्यवहार करत आहेत. काल दिवसभरात शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी रेंजमध्ये व्यवहार करताना दिसल्याचे एलकेपी सिक्युरीटीजचे रुपक डे म्हणाले. बाजार बंद होण्याच्या वेळी निफ्टी 17700 च्या वर बंद झाला. डेली चार्टवर निफ्टी घसरणीच्या ट्रेंड लाइनच्या खाली आला. हा कमकुवत अपट्रेंड दाखवत आहे. डेली चार्टवरील डेली आरएसआय बियरीश क्रॉसओव्हर दाखवत आहे, जो फॉलिंग मोमेंटमचे संकेत देत आहे.

जोपर्यंत इंडेक्स 17700 च्या वर बंद होण्यात यशस्वी होईल तोपर्यंत नजीकचा ट्रेंड सकारात्मक दिशेने बाजूला राहू शकतो. पण, तो 17700 च्या खाली आला तर बाजारात करेक्शन दिसून येईल. 17700 च्या खाली घसरल्यास निफ्टी 17500/17350 पर्यंत घसरू शकतो. वरच्या बाजूस, 17850-17900 वर रझिस्टंस दिसून येतो.

गुरुवारी अर्थात आज सुरुवातीच्या व्यापारात फेड बैठकीच्या निकालावर बाजार सगळ्यात आधी रिऍक्ट होईल असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. याशिवाय आजच्या विकली एक्सपायरीमुळे बाजारात अस्थिरता वाढेल असे ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

ब्रिटानिया (BRITANNIA)
हिंदुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)
आयटीसी (ITC)
अपोलो हॉस्पिटल (APPOLOHOSP)
बजाज फायनान्स (BAJAJFIN)
एल अँड टी टेक्नोलॉजी सर्व्हिसेज (LTTS)
पेज इंडिया (PAGEINDIA)
ट्रेंट (TRENT)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT