मागील काही दिवसात शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. बँकिंग शेअरमध्यही तेजी दिसून येत असून केमिकस शेअर्समध्येही खरेदीचा जोर दिसत आहे. बाजारातील व्यवहाराला आज सुरुवात झाल्यानंतर बाजारात सेन्सेक्समध्ये 436 हून अधिक अंकांची तेजी दिसून आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 149 अंकांनी वधारला आणि 17,008 अंकांवर खुला झाला आहे. तर सेन्सेक्स 57,039 अंकांवर खुला झाला आहे.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बुधवारी बाजारात कमजोर कल दिसून आल्याचे कोटक सिक्युरीटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला 17,000 वर रझिस्टंस दाखवत आहे. या पातळीच्या खाली गेल्यास निफ्टी 16,700-16,650 पर्यंत घसरू शकतो. दुसरीकडे, निफ्टी 17,000 च्या वर गेल्यास, त्यात एक छोटी रिकव्हरी रॅली दिसू शकते. यार गेल्यास निर्देशांक 17,100-17,200 पर्यंत चढू शकतो.
निफ्टीला 16,700 ते 16,650 दरम्यान मोठा सपोर्ट मिळत असल्याचे श्रीकांत म्हणाले. जर निफ्टी 16,700 च्या पातळीवर घसरला तर तुम्ही इंडेक्समधील हेवीवेट शेअर्स खरेदी केले पाहिजेत असेही ते म्हणाले.
कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात कोणताही दिलासा नसल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. जर निफ्टीने 16,800 ची पातळी तोडली सेंटीमेंट्स आणखी कमकुवत होऊ शकतात. दरम्यान, निवडक निर्देशांक ओव्हरसोल्ड पोझिशनमध्ये असल्याने त्यात थोडी तेजी दिसू शकते.
दलाल स्ट्रीट 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आरबीआय सप्टेंबर एमपीसी बैठकीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तापसे म्हणाले. तांत्रिक दृष्टिकोनातून निफ्टीला 16,277-16,438 झोनमध्ये सपोर्ट मिळत असल्याचे दिसते. जोपर्यंत तो ही पातळी कायम ठेवतो, तोपर्यंत निफ्टी 17,321 च्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. ही पातळी ओलांडल्यास निफ्टी पुन्हा 17,727 च्या पातळीवर जाऊ शकतो.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
हिन्दाल्को (HINDALCO)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
ऍक्सिस बँक (AXISBANK)
आयटीसी (ITC)
रिलायन्स (RELIANCE)
ए यू बँक (AUBANK)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
आयडीएफसी (IDFC)
लॉरस लॅब (LAURUSLAB)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDUPETRO)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.