Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 1,000 तर निफ्टीमध्ये 292 अंकांची घसरण

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजार कोसळला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates Today: आज आठवड्याच्या पहिल्याच दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजार कोसळला आहे. शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दिलं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 1,000.35 अंकांनी घसरून 57,338.58 वर सुरु झाला तर निफ्टी 292.2 अंकांनी घसरून 17,183.45वर सुरु झाला. निफ्टी 50 मधील 42 शेअर्समध्ये दिवसाच्या सुरुवातील घट झाली, तर केवळ 8 शेअर्समध्ये वधारल्याचं पाहायला मिळालं.

तत्पूर्वी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात विक्रीचा जोर राहिला. महागाईच्या चिंतेमुळे बाजारावर दबाव राहिला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 237.44 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 58,338.93 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 54.65 अंकांनी अर्थात 0.31 टक्क्यांनी घसरून 17,475.65 वर बंद झाला.

मागच्या सुट्टीच्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 1.8 टक्के (1,108.25 अंक) आणि 1.7 टक्क्यांनी (308.65 अंक) घसरले. 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती तर 15 एप्रिलला गुड फ्रायडेनिमित्त बाजार बंद होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT