Best Stocks to Buy Today Sakal
अर्थविश्व

Share Market: आज शेअर बाजाराचा मूड कसा असेल? हे 10 शेअर्स करतील कमाल

बुधवारी पुन्हा एकदा सर्वच सेक्टरमधील विक्रीदरम्यान बेंचमार्क इंडेक्समध्ये सुमारे एक टक्क्यांची घसरण दिसून आली.

शिल्पा गुजर

बुधवारी पुन्हा एकदा सर्वच सेक्टरमधील विक्रीदरम्यान बेंचमार्क इंडेक्समध्ये सुमारे एक टक्क्यांची घसरण दिसून आली. कमकुवत जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. यानंतर दुपारच्या सत्रात विक्री वाढली. सेन्सेक्स 537.22 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 56,819.39 वर बंद झाला. निफ्टी 162.40 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 17,038.40 वर बंद झाला.

निफ्टी बँक आणि एनर्जी प्रत्येकी एक टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे, ऑटो, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि पीएसयू बँक इंडेक्स 0.5% घसरले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

गेल्या काही सत्रांमध्ये प्राइस ऍक्शनमध्ये ट्रायंग्युलर पॅटर्न दिसून आल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. हा पॅटर्न पुढे चालू राहण्याची शक्यता आहे. तर इंडेक्स 17,150-16,900 च्या कॅटेगरीत ब्रीफ कंसोलिडेशन दिसू शकते. शॉर्ट टर्मच्या दृष्टीकोनातून, निफ्टी 16,824 च्या नीचांकी पातळीवर जाण्याची अपेक्षा आहे. असे झाल्यास तो 16,600 च्या पातळीवरही घसरू शकतो.

तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास बाजारात नॉन-डायरेक्शनल हालचाली दिसत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहानचे म्हणाले. इंडेक्स पुन्हा एकदा 50-दिवसांच्या SMA खाली बंद झाला. गॅप डाउन ओपनिंगनंतर निफ्टीने बियरीश कँडल तयार केली. सध्या ट्रेडर्ससाठी 17,125 रेझिस्टन्स पातळी असेल. जर इंडेक्नेस 17,125 ची पातळी तोडली तर तो 17,200 वर जाण्याची शक्यता आहे. निफ्टीने 17,000 च्या खाली ट्रेड केल्यास, त्यात आणखी कमजोरी वाढू शकते. जर 17,000 च्या खाली गेल्यास त्यात 16,900-16,850 च्या स्तरावर जाऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

हीरो मोटोकॉर्प (HEROMOTOCORP)

टाटा स्टील (TATASTEEL)

एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)

एचसीएल टेक (HCLTECH)

आयशर मोटर्स (EICHERMOT)

बालक्रिश्न इंडस्ट्रीज (BALKRISIND)

एमफॅसिस (MPHASIS)

पर्सिस्टेंट सिस्टम्स (PERSISTENT)

लॉरस लॅब लिमिटेड (LAURUSLAB)

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT