Todays Share market News Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजारात पॉझिटीव्ह वातावरण, आज कोणत्या 10 शेअर्सवर कराल फोकस?

रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतता चर्चा आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीच्या अहवालानंतर शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात उच्च पातळीवर बंद झाला.

शिल्पा गुजर

Share Market Pre Analysis: रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतता चर्चा आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीच्या अहवालानंतर शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात उच्च पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 350.16 अंकांनी अर्थात 0.61 टक्क्यांनी वाढून 57,943.65 वर बंद झाला आणि निफ्टी 103.30 अंकांनी अर्थात 0.60 टक्क्यांनी वाढून 17,325.30 वर बंद झाला.

चीनच्या बाजारपेठेत कोविड निर्बंधांमध्ये वाढ झाली आहे. एकीकडे रुस यु्क्रेनमधील शांतता चर्चेची शक्यता आणि मागणी कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.

निफ्टीमध्ये आयशर मोटर्स, डिव्हीज लॅब्स, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी आणि अदानी पोर्ट्समध्ये वाढ दिसून आली. दुसरीकडे, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, कोल इंडिया, इंडियन ऑईस कॉर्पोरेशन आणि आयटीसी या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

बीएसईवर ऑईल अँड गॅस वगळता सर्व निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. हेल्थकेअर आणि रियल्टी 1-1 टक्क्यांनी वाढले आणि कॅपिटल गूड्स इंडेक्स 0.65 टक्क्यांनी वाढला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी 0.6 टक्क्यांनी वाढले.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

निफ्टी 17,330 च्या रझिस्टंस खाली बंद झाला. तर डेली चार्टवरील हॅमर कॅंडल पॅटर्ननंतर बेंचमार्क निर्देशांकात रिकव्हरी झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजच्या रुपक डे यांनी म्हटले. निफ्टीमध्ये 17,330 पोलॅरिटी पॉइंट दिसू शकतो. या पलीकडे, 17,330 च्या वर मजबूत तेजी दिसू शकते. तर खाली 17,200 वर महत्त्वाचा सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स?

आयशर मोटर्स (EICHERMOT)

एचडीएफसी (HDFC)

डिवीज लॅबोरेटॉरी (DIVISLAB)

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

जेएसडब्ल्यब स्टील (JSWSTEEL)

मॅक्स फायनांशियल सर्विसेज (MFSL)

बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

पेज इंडिया (PAGEIND)

व्होल्टास (VOLTAS)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरेंनी लाज राखली ;वरळीचा गड राखला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: फुलंब्री विधानसभा संघात अनुराधा चव्हाण 28900 मताने आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT