यूएस फेडच्या निर्णयामुळे गुरुवारी बाजारात अत्यंत उत्साहाचे वातावरण राहिले. त्यामुळेच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही विक्रमी उच्चांकावर बंद झाले.
शिल्पा गुजर - यूएस फेडच्या निर्णयामुळे गुरुवारी बाजारात अत्यंत उत्साहाचे वातावरण राहिले. त्यामुळेच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही विक्रमी उच्चांकावर बंद झाले. रिअल्टी शेअर्समध्ये गुरुवारी चांगली तेजी दिसली, ज्याचा परिणाम DLF च्या शेअर्सवरही दिसला आणि DLF च्या मार्केट कॅपने 1 लाख कोटी पार केले.
गुरुवारी, छोट्या-मध्यम शेअर्समध्येही मोठी वाढ झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.30 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.89 टक्के वाढीसह बंद झाला. गुरुवारी मिडकॅप, सरकारी बँका, मेटल, ऑटो, पॉवर आणि मीडिया शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली.
गुरुवारच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या 30 पैकी 27 शेअर्समध्ये वाढ दिसून आली, तर निफ्टीच्या 50 पैकी 40 शेअर्समध्ये तेजी दिसली. निफ्टी बँकेच्या सर्व 12 शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
बाजार संपल्यावर सेन्सेक्स 958.03 अंकांनी अर्थात 1.63 टक्क्यांच्या वाढीसह 59,885.36 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 276.30 अंक अर्थात 1.57 टक्क्यांच्या वाढीसह 17,822.95 वर बंद झाला.
शुक्रवारी म्हणजेच आज कोणते शेअर्स तुम्हाला रग्गड कमाई करून देतील त्यावर एक नजर टाकूयात...
निफ्टी 50 (NIFTY 50)
- BAJAJFINSV
- हिंडल्को (HINDALCO)
- LT
- टाटा मोटर्स ( TATAMOTORS)
- कोल इंडिया (COALINDIA)
निफ्टी नेक्स्ट 50 ( NIFTY NEXT 50)
- डीएलएफ 402.90 (DLF 402.90)
- मॅकडोवेल - एन (MCDOWELL-N)
- पीईएल (PEL)
- BAJAJHLDNG
- APOLLOHOSP
निफ्टी मिडकॅप 50 (NIFTY MIDCAP 50)
- गोद्रेजप्रॉप (GODREJPROP)
- सनटीव्ही (SUNTV)
- टाटापॉवर (TATAPOWER)
- आरबीएल बँक ( RBLBANK)
- IBULHSGFIN
निफ्टी बँक (NIFTY BANK)
- आरबीएल बँक ( RBLBANK)
- एक्सीस बँक ( AXISBANK)
- INDUSINDBK
- SBIN
- एचडीएफसी बँक (HDFCBANK)
निफ्टी फायनांशियल सर्व्हिसेस (NIFTY FINANCIAL SERVICES)
- PEL
- BAJAJFINSV
- एचडीएफसी (HDFC)
- एक्सीस बँक ( AXISBANK)
- SRTRANSFIN
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.