Money  esakal
अर्थविश्व

Share Market : 'या' कंपनीच्या शेअर्समुळे संपूर्ण गाव बनले करोडपती

1980 मध्ये शेअरची किंमत फक्त 100 रुपये होती. आता या शेअरची किंमत 382 रुपये आहे.

सकाळ डिजिटल टीम

आयटी कंपनी विप्रोने आपल्या गुंतवणूकदारांवर मोठ्या प्रमाणात शेअर्समधून परतावा दिला आहे. 43 वर्षांपूर्वी एखाद्याने शेअर्समध्ये फक्त 10,000 रुपये गुंतवले असतील आणि ते कायम ठेवले असतील तर आज तो सुमारे 985 कोटी रुपयांचा मालक असेल.

गेल्या एका वर्षात शेअर्समध्ये सुमारे 45 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 2022 मध्ये शेअर्स 45.22 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

त्याची सध्याची किंमत निफ्टीवर 382 रुपये आहे. शुक्रवारी त्यात सुमारे 5 रुपयांची (1.27 टक्के) घसरण झाली. गेल्या वर्षभरात केवळ विप्रोलाच गुंतवणूकदारांच्या उदासीनतेचा फटका बसला नाही. इतर आयटी शेअर्सच्या बाबतीतही असेच घडले आहे.

मात्र, याआधी विप्रोने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत शेअर्स 64 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 726 रुपये आहे. त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 372.40 रुपये आहे.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला...

सध्या तो त्याच्या नीचांकाच्या अगदी जवळ आहे. असे असूनही, विश्लेषक अद्याप त्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत. 40 पैकी केवळ 9 तज्ञ या स्टॉकमध्ये राहण्याचा सल्ला देत आहेत.

1980 मध्ये, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 10,000 रुपये ठेवले असते आणि ते कायम ठेवले असते तर तो जवळजवळ अब्जाधीश झाला असता. आज त्या गुंतवणुकीचे मूल्य 985 कोटींच्या पुढे गेले असते.

तेव्हा या शेअरची किंमत फक्त 100 रुपये होती. आता या शेअरची किंमत 382 रुपये आहे. दरम्यान, कंपनीने आपले शेअर्स विभाजित केले आणि शेअरधारकांना बोनस शेअर्सही दिले.

1980 मध्ये, ज्या व्यक्तीने 10,000 रुपये गुंतवून त्याचे 100 शेअर्स विकत घेतले, त्याच्याकडे आज कोणतेही अतिरिक्त पैसे न गुंतवता 2,55,36,000 शेअर्स आहेत.

कंपनीने 1989, 92, 95, 97, 04, 05, 2010, 17 आणि 19 मध्ये बोनस शेअर जारी केले. त्याच वेळी, 1999 मध्ये शेअर्सचे विभाजन झाले. अशा प्रकारे गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या खूप वाढली.

महाराष्ट्रातील आलमनेर या गावात ही कंपनी सुरू झाली. आजही इथे मुलाचा जन्म होताच विप्रोचे शेअर्स विकत घेतले जातात. या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे विप्रोचे शेअर्स आहेत आणि ते करोडपतींचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

SCROLL FOR NEXT