Share Market Updates sakal
अर्थविश्व

Share Market: घसरणीला ब्रेक; आज सेन्सेक्स 592 अंकाच्या तेजीत

सकाळ डिजिटल टीम

आज सुरवातीला शेअर बाजार तेजीत दिसून येत आहे. या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ उतार पाहायला मिळाला. तसेच आज गुंतवणुकदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.

आज सेन्सेक्स 592 अंकाच्या तेजीसह 59,410 वर सुरू झाला तर निफ्टी 159 अंकाच्या तेजीसह 17,695 वर सुरू झाला. आज शेअर बाजारात तेजी दिसून देत आहे मात्र दिवसभरात शेअर बाजारातील शेअर्सच्या चढ उताराकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आज सुरवातीच्या सत्रात 23 शेअर्समध्ये तेजी तर 3 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. विशेष म्हणजे काल टाटाच्या शेअर्स मध्ये वाढ झाली होती. तर आज सकाळी टाटांच्या शेअर्स घसरलेले दिसत आहेत. तर बँकींग आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.

बाजारात मोठी कमजोरी येण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जोपर्यंत निर्देशांक आदल्या दिवशीचा 17,359 चा नीचांक मोडत नाही तोपर्यंत कोणतीही मोठी कमजोरी अपेक्षित नाही. पण, जूनच्या नीचांकी पातळीपासून 15 टक्क्यांच्या वाढीनंतर बाजार ओवरबॉट झालेला दिसतो.

बुल्स हाय लेव्हल गाठण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चार्टव्यूइंडियाचे चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट मजहर मोहम्मद म्हणाले. दुसरीकडे, बुधवारच्या व्यापार सत्रात हँगिंग मॅन फॉर्मेशन तयार करत असल्याचे दिसले. डेली आणि काही विकली ऑसिलेटरवर जास्त खरेदी केलेले रीडिंग असूनही, प्राइस चार्ट कोणतीही कमजोरी दाखवत नाहीत असा त्यांचा विश्वास आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दाल्को (HINDALCO)
कोल इंडिया (COALINDIA)
युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)
टाटा स्टील (TATASTEEL)
अपोलो हॉस्पिटल (APPOLOHOSPITAL)
आयआरसीटीसी (IRCTC)
भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)
लॉरस लॅब (LAURUSLAB)
डिक्सन (DIXON)
अशोक लेलँड (ASHOKLEY)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT