Share Market Latest Updates | Stock Market News sakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1,138 तर निफ्टी 322 अंकांनी गडगडला

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: गेल्या काही दिवसांपातून जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यपूर्ण घसरण होत असताना सोमवार आणि मंगळवारी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला होता, मात्र काल पुन्हा शेअर बाजारात घसरण झाली होती. आज घसरणीचं हेच सत्र कायम राहिले. आज शेअर बाजार सुरु होताना मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 1,138.23 अंकांनी घसरून 53070.30 वर सुरु झाला, तर निफ्टी 322.9 अंकांनी घसरून 15917.40 वर सुरु झाला.

2 दिवसांच्या वाढीनंतर, बुधवारी बाजार हलक्या लाल चिन्हात बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 109.94 अंकांनी म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 54,208.53 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 19.00 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 16,240.30 वर बंद झाला.

फार्मा आणि एफएमसीजी शेअर्समुळे दुपारपर्यंत देशांतर्गत बाजारात चांगली मजबूती होती असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. इंग्लंडमध्ये किरकोळ महागाईची वाढती आकडेवारी आणि फेडच्या अध्यक्षांकडून महागाई कमी करण्याचे आश्वासन यामुळे बाजारातील भावना खराब झाली. पुढे जाऊन जागतिक मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात झालेली वाढ पाहायला मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: कसली ही नामुष्की! मनसेचा मुंबईत सुपडा साफ पण या उमेदवारांना दिला दणका..वाचा कोणाला किती मतं मिळाली?

Mumbai Vidhansabha Result 2024: मुंबईत महिलांनी पुरुषांना टाकलं मागे; आकडेवारी वाचून व्हाल थक्क!

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

Hingna Assembly Election : हिंगण्यात ‘लाडक्या बहिणी’च ठरल्या ‘गेमचेंजर’...महायुतीच्या ‘लिड’मध्ये दुप्पटीने वाढ, महाविकास आघाडी हवेत

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT