VLCCs IPO esakal
अर्थविश्व

VLCC IPO: लवकरच येणार व्हिएलसीसीचा आयपीओ

VLCC डिसेंबरच्या अखेरीला आपला आयपीओ आणण्याची शक्यता आहे.

शिल्पा गुजर

ब्यूटी आणि वेलनेस कंपनी VLCC आता आपला IPO घेऊन येत आहे. यासाठी सेबीने मान्यता दिली आहे.

VLCC, भारतातील सर्वात मोठ्या देशांतर्गत ब्यूटी आणि वेलनेस कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीला शुक्रवारी आयपीओसाठी बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाल्याची माहिती शेअर बाजार सूत्रांकडून मिळाली.

VLCC डिसेंबरच्या अखेरीला आपला आयपीओ (Initial Public Offering) आणण्याची शक्यता आहे. कंपनीच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, आयपीओमध्ये 300 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आणि प्रमोटर्स आणि विद्यमान भागधारकांद्वारे 89.22 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे असे समजत आहे.

किती शेअर्सची विक्री ?

VLCC च्या ओएफएसमध्ये (OFS) प्रमोटर मुकेश लुथरा यांच्याद्वारे 18.83 लाख इक्विटी शेअर्सची विक्री, ओआयएच मॉरिशस लिमिटेडद्वारे 18.97 लाख इक्विटी शेअर्स आणि लियोन इंटरनॅशनलद्वारे 52.42 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाईल.

सध्या कंपनीत वंदना लुथरा आणि मुकेश लुथरा यांच्याकडे अनुक्रमे 44.35 टक्के आणि 24.37 टक्के भागिदारी आहे. याशिवाय, लियॉन इंटरनॅशनलकडे 13.65 टक्के आणि ओआयएच मॉरिशसकडे 5.04 टक्के हिस्सा आहे.

आयपीओ नेमका कशासाठी ?

आयपीओमधून आलेला पैसा भारतात VLCC वेलनेस क्लिनिक, गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल (GCC) क्षेत्र आणि VLCC संस्था स्थापन करण्यासाठी वापरला जाईल. याशिवाय, काही रक्कम भारत आणि GCC क्षेत्रातील काही विद्यमान VLCC वेलनेस क्लिनिकच्या नूतनीकरणासाठी वापरली जाईल. तसेच, हा पैसा ब्रँड डेव्हलपमेंट, डिजिटल आणि माहिती तंत्रज्ञानसारख्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक तसेच कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल.

ऑगस्टमध्ये आयपीओसाठी अर्ज

व्हीएलसीसी हेल्थ केअरने ऑगस्टमध्ये सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्र दाखल केली होती अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

VLCC नेमके काय करते ?

वीएलसीसी हेल्थ केयर (VLCC Health Care) ब्यूटी आणि न्यूट्रीशियनमध्ये स्किल डेव्हलेपमेंटसाठी व्हिएलसीसी ब्रँडेड वेलनेस अँड ब्यूटी क्लिनिक आणि व्हिएलसीसी ब्रँडेड संस्था चालवते. व्हिएलसीसी ब्रँडेड पर्सनल केअर प्रॉडक्ट्सचे उत्पादन आणि विक्रीहीकरते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT