Share Market sakal
अर्थविश्व

Share Market : 'या' कंपनीचा शेअर 240 रुपयांवरुन पोहोचला 23 हजारांवर; गुंतवणूकदारांची झाली चांदी

या शेअर्सने गुंतवणूकदारांना गेली बरेच वर्ष दमदार परतावा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिग्गज कंपनी थ्रीएम इंडियाच्या (3M India) शेअर्सने गुंतवणूकदारांना गेली बरेच वर्ष दमदार परतावा दिला आहे. गेल्या काही महिन्यांत तो आणखी 28 टक्के मजबूत झाला आहे. दुसरीकडे लाँग टर्ममध्ये या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास 96 पटीने वाढवली आहे. थ्रीएम इंडियाचा शेअर सध्या बीएसईवर 109.35 रुपयांच्या वाढीसह 22946.10 रुपयांवर ट्रेड करत आहे.

3M इंडियाचे शेअर्स 11 एप्रिल 2003 रोजी केवळ 240 रुपयांवर होते. आता त्याची किंमत 22946.10 रुपये आहे. म्हणजे त्यावेळी कुणी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ते आता 96 पटीने वाढून 96 लाख रुपये झाले असते. यावर्षी 11 फेब्रुवारीला त्याचे शेअर्स 26,858 रुपयांवर व्यवहार करत होते, जे एका वर्षातील उच्चांक आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

यानंतर शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसला आणि तो 27 मे 2022 पर्यंत 36 टक्क्यांनी घसरला, यासह त्याची किंमत 17,300 रुपयांपर्यंत घसरला. जो 52 आठवड्यांचा विक्रमी नीचांक आहे. यानंतर, त्याने पुन्हा चांगली रिकव्हरी झाली आणि आतापर्यंत सुमारे 33 टक्के वाढ झाली आहे, पण तरीही एका वर्षाच्या विक्रमी उच्चांकावरून तो 15 टक्के सूटवर मिळत आहे.

थ्री एम इंडिया (3M India) ही कंपनी पॉलिशिंग पेपर, मास्किंग टेप, बाथरूम टॉवेल हुक, स्टेथोस्कोप स्पेअर पार्ट्स, स्टिंग बॅरियर फिल्म आणि इतर अनेक उत्पादने तयार करते. ही कंपनी घरगुती, ऑफिस सप्लाईज, मेडिकल, टेप्स, टूल्स एंड इक्विपमेंट, लुब्रिकंट्स, फिल्म्स एंड शीटिंग, इलेक्ट्रिकल, डेंटल आणि कोटिंग्ज यासारख्या क्षेत्रांसाठी उत्पादने तयार करते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT