Stock Market news Sakal
अर्थविश्व

Share Market : 'या'स्टॉकचा तीन वर्षात 800 टक्के बंपर परतावा!

टिकाऊपणासाठी सीपीपी आणि बीओपीपीची मोनो रिअल स्ट्रक्चरला पसंती आहे.

शिल्पा गुजर

टिकाऊपणासाठी सीपीपी आणि बीओपीपीची मोनो रिअल स्ट्रक्चरला पसंती आहे.

कॉस्मो फिल्म्स लिमिटेडच्या (Cosmo Films Ltd) शेअर्समध्ये मजबूत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) औरंगाबादमधल्या (Aurangabad) सीपीपी उत्पादन युनिटची क्षमता वाढवण्यासाठी कंपनी 140 कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) करणार असल्याचे समजत आहे. या युनिटची कंपनीची उत्पादन क्षमता वार्षिक 25,000 मेट्रिक टन पर्यंत वाढवायची आहे.

जगभरातील पॅकेजिंग फिल्मच्या पुनर्वापरावर आणि टिकाऊपणावर भर दिला जात असल्याचे कॉस्मो फिल्म्सचे सीईओ पंकज पोदार यांनी एक्स्चेंजला ही माहिती दिली. टिकाऊपणासाठी सीपीपी आणि बीओपीपीची मोनो रिअल स्ट्रक्चरला पसंती आहे.

कंपनीची सध्याची CPP क्षमता 100 टक्के ताकदीने काम करत आहे. अशा परिस्थितीत वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी आपल्या सध्याच्या युनिटची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. याशिवाय कंपनी इतर अनेक विकास योजनांवरही काम करत आहे. ज्यात बीओपीईटी लाइन, बीओपीपी लाईन संबंधित योजनांचा समावेश आहे. हे लक्षात घेऊन सुमारे 140 कोटी रुपयांची ही विस्तार योजना करण्यात आली आहे. पुढील 2 वर्षांत कंपनी मोठ्या उत्पादन क्षमतेसह काम सुरू करेल अशी अपेक्षा आहे.

गेल्या 3 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर गेल्या 1 वर्षात सुमारे 184 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने 26 टक्के परतावा दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT