Share Market: Jyoti resins esakal
अर्थविश्व

Share Market: अप्पर सर्किटमध्ये 'ही' केमिकल कंपनी; अवघ्या 5 आठवड्यात वाढले 100% शेअर्स

गेल्या पाच आठवड्यापासून 'या' कंपनीच्या शेअर्सला उधाण आले आहे

सकाळ डिजिटल टीम

Jyoti resins: स्पेशायलिटी केमिकल कंपनी ज्योती रेजिन्स अँड ऍडेसिव्ह्ज लिमिटेडचे (Jyoti Resins & Adhesives Ltd) शेअर्स बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात अप्पर सर्किट लागले आणि बीएसईवर शेअर्स 5 टक्क्यांनी वाढून 1,769.70 रुपयांवर पोहोचले. हा सलग पाचवा व्यवहार दिवस आहे, जेव्हा ज्योती रेझिन्सच्या शेअर्सनी अप्पर सर्किटमध्ये प्रवेश केला आहे आणि या काळात तो जवळपास 26 टक्क्यांनी वाढला आहे. दुपारी ज्योती रेझिन्सचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह सुमारे 1753 रुपयांवर होते.

ज्योती रेझिन्सने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 80 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, केवळ 5 आठवड्यांत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत आणि त्यांना 105 टक्के परतावा दिला आहे. ज्योती रेझिन्सचे शेअर्स 2022 पासून सुमारे 380 टक्क्यांनी वाढलेत. तर गेल्या 1 वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 525 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 2022 च्या सुरुवातीला ज्योती रेझिन्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या 1 लाखाचे 4 लाख 70 हजार झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी ज्योती रेझिन्सच्या शेअर्समध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती, तर आज त्या 1 लाखाचे 6 लाख 26 हजार झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने ज्योती रेझिन्सच्या शेअर्समध्ये फक्त 5 आठवड्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे दुप्पट अर्थात 2 लाख रुपये झाले असते.

बोनस शेअर्स देणार

ज्योती रेजिन्स अँड ऍडेसिव्ह्ज लिमिटेडचे (Jyoti Resins & Adhesives Ltd) ही स्मॉल कॅप स्पेशालिटी केमिकल कंपनी असून तिचे मार्केट कॅप 2.11 हजार कोटी आहे. कंपनीने नुकतेच भागधारकांना 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली होती आणि 8 सप्टेंबरपासून त्यांचे शेअर्स एक्स-बोनस म्हणून व्यवहार करत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT