जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजारातही चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा वेळी तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले स्टॉक समाविष्ट करायचे असतील, तर तुम्ही टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांच्या इंडियन हॉटेल्स (The Indian Hotels Company Limited) आणि टाटा मोटर्सच्या (Tata Motors) शेअर्सचा विचार करु शकता. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी टाटा मोटर्सचा त्यांच्या टॉप रिसर्च आयडीयामध्ये समावेश केला आहे.
टाटा मोटर्स टारगेट - 485 रुपये
मोतीलाल ओसवाल 'BUY' रेटिंग देत 485 रुपयांचे टारगेट दिले आहे. तसेच एक वर्षांहून अधिक काळ हा शेअर ठेवावा असा सल्लाही दिलाय. 6 मे 2022 रोजी टाटा मोटर्सचा शेअर 421 रुपयांवर बंद झाला. या किंमतीपासून, गुंतवणूकदारांना प्रति शेअर सुमारे 15 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या वर्षभराबाबत बोलायचे झाले तर हा शेअर जवळपास 35 टक्क्यांनी वाढला आहे.
इंडियन हॉटेल्स - 278 रुपये
आयडीबीआय कॅपिटलही इंडियन हॉटेल्सबाबत पॉझिटीव्ह आहेत. ब्रोकरेज हाऊसने 'BUY' रेटिंग दिले आहे, तर टारगेट 278 रुपये दिले आहे. 26 मे 2022 रोजी इंडियन हॉटेल्सच्या शेअरची किंमत सुमारे 220 रुपये होती. या किंमतीपासून, गुंतवणूकदारांना प्रति शेअर सुमारे 26 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर हा शेअर 75 टक्क्यांनी वधारला आहे.
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्स आणि इंडियन हॉटेल्स या दोन्ही शेअर्सचा समावेश आहे. मार्च 2022 तिमाहीच्या आकडेवारीनुसार, राकेश झुनझुनवाला यांची टाटा मोटर्समधील होल्डिंग 1.2 टक्क्यांपर्यंत (39,250,000 इक्विटी शेअर्स) वाढली आहे. तर, इंडियन हॉटेल्सकडे 2.1 टक्के (30,016,965 इक्विटी शेअर्स) आहेत. ट्रेंडलाइननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 34 स्टॉक्स आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 33,753.9 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.