share market share market
अर्थविश्व

शेअर बाजारात आजही तेजीचे संकेत, कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

मागच्या आठवड्यात शेअर बाजाराने नवा विक्रम नोंदवला.

सकाऴ वृत्तसेवा

मागच्या आठवड्यात शेअर बाजाराने नवा विक्रम नोंदवला.

- शिल्पा गुजर

मागच्या आठवड्यात बाजारात चांगली तेजी राहिली. ही तेजी सलग दुसऱ्या आठवड्यातही दिसून आली. मागच्या आठवड्यात शेअर बाजाराने नवा विक्रम नोंदवला. गुरुवारी संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 1,246.89 अंकांनी अर्थात 2.07 टक्क्यांनी वधारून 61,305.95 वर बंद झाला. निफ्टी 443.3 अंकांनी अर्थात 2.47 टक्क्यांनी वधारून 18,338.5 वर बंद झाला.

लघु-मध्यम शेअर्समध्ये मोठी तेजी बघायला मिळाली. ज्यामुळे बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे 3.3 आणि 2 टक्क्यांनी वाढ झाली. स्मॉलकॅपचे 60 हून अधिक शेअर्स 10-39 टक्क्यांनी वाढले. यामध्ये ओरोसिल रिन्युएबल्स, जीओसीएल कॉर्पोरेशन, एमएसटीसी, महाराष्ट्र सीमलेस, नेटवर्क 18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स, आयनॉक्स विंड, बोरोसिल, स्वेलेक्ट एनर्जी सिस्टिम्स आणि न्यूलँड लॅबोरेटरीज यांचा समावेश आहे.

दुसरीकडे एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स (SREI Infrastructure Finance), चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स, नुरेका, बजाज हिंदुस्थान शुगर, श्रीराम ईपीसी, नाझारा टेक्नॉलॉजीज आणि बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिस या कंपन्यांमध्ये 10-18 टक्क्यांनी घसरण झाली.

निफ्टी 18200 आणि 18250 च्या वर राहिला तर 18,550-18,600 ची पातळी गाठू शकतो असे कॅपिटलव्हिया ग्लोबल रिसर्चचे आशिष विश्वास म्हणाले. इतर टेकनिकल इंडिकेटर्ससुद्धा बाजारात तेजीचे संकेत देत आहेत.

आज अर्थात आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात तेजी राहिल असे संकेत मिळत आहेत.

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?

- अदानीपोर्ट्स (ADANIPORTS)

- विप्रो (WIPRO)

- ग्रासिम (GRASIM)

- एसडीफसी बँक (HDFCBANK)

- आयटीसी (ITC)

- आयआरसीटीसी (IRCTC)

- माईंडट्री (MINDTREE)

- कॉन्फॉर्ज (COFORGE)

- एमफॅसिस (MPHASIS )

- पीएफसी (PFC)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Property Rights: खाजगी मालमत्ताधारकांच्या हक्कांना मिळाला मजबूत आधार ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? मुंबई इंडियन्सच नव्हे, तर चार तगडे संघ बोली लावणार

Nashik Vidhan Sabha Election: विधानसभेत महायुतीला 175 जागा मिळणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहिती

Diwali Weekend Hotel Spike : शहर निघाले हॉटेलिंगला..! चार दिवसांत ३ ते ४ कोटींची उलाढाल, सुट्यांमध्ये गाठणार ९ कोटींचा टप्पा

Heena Gavit : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा झटका! माजी खासदाराचा पक्षाला रामराम; विधानसभेच्या मैदानात अपक्ष लढणार

SCROLL FOR NEXT