नफा कमावण्याच्या नादात रियॅलिटी, एफएमसीजी आणि मेटल इंडेक्स मोठ्या प्रमाणात घसरले.
मंगळवारी शेअर बाजारात पॉवरपॅक अॅक्शन दिसून आली. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 62,000 ची पातळी गाठली आणि निफ्टीही 18,600 वर पोहोचला. त्याच वेळी, बँक निफ्टीनेही 40,000 पर्यंत गेली पण त्यानंतर बाजारात प्रॉफिट-बुकिंग सुरू झाले आणि शेअर मार्केट घसरणीवर बंद झाले. सर्वात जास्त विक्री मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये झाली. नफा कमावण्याच्या नादात रियॅलिटी, एफएमसीजी आणि मेटल इंडेक्स मोठ्या प्रमाणात घसरले. ऑटो, फार्मा, बँकिंग शेअर्सचीही विक्री होत होती. दुसरीकडे आयटी शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली. पण दूसरीकडे आयटी निर्देशांक 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला.
मंगळवारचा दिवस संपल्यावर सेन्सेक्स 49.54 अंकांनी अर्थात 0.08 टक्क्यांनी घसरून 61,716.05 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 58.30 अंक अर्थात 0.32 टक्क्यांनी खाली 18,418.75 वर बंद झाला. मंगळवारी बाजारात नफा वसुली अर्थात प्रॉफिट बुकिंग झाली म्हणून शेअर बाजार पडल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे एस रंगनाथन म्हणाले. मात्र, आयटी निर्देशांक ठाम राहिला आणि उच्चांकावर बंद झाला. शेअर बाजाराची नजर प्रायमरी मार्केटमधील संधींवरही आहे. मंगळवारी अनेक टॉप परफॉर्मिंग मिडकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून आली.
बुधवारी अर्थात आज कशी असेल शेअर बाजारातील स्थिती ?
टेक्निकल बाजू लक्षात घेतली तर निफ्टीने ट्रेंडच्या टॉपवर एक लॉन्ग बेअरिश कँडल बनवल्याचे चॉईस ब्रोकिंगचे सचिन गुप्ता यांनी म्हटले. याचा अर्थ काउंटरमध्ये आणखी उलथापालथ होण्याचे संकेत आहे. तर, निफ्टी डेली चार्टवर अप्पर बोलिंजर बँड फार्मेशनवर इमीजिएट सपोर्ट दिसत आहे. त्याच वेळी, स्टोकॅस्टिकने (stochastic) ओवरली चार्टवर ओव्हर सोल्ड झोनला स्पर्श केला आहे. निफ्टीसाठी 18,200 पातळीवर सपोर्ट दिसतो आहे. त्याच वेळी, रेझिस्टन्स 18,600 वर दिसतो आहे.
बुधवारी अर्थात आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?
- आयटीसी (ITC)
- टाटा मोटर्स (TATAMOTORS)
- आयशर मोटर्स (EICHERMOT)
- हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (HINDUNILVR)
- टायटन (TITAN)
- आयआरसीटीसी (IRCTC)
- टाटा पॉवर (TATAPOWER)
- भारत हेवी इलेक्ट्रिकल (BHEL)
- आयडिया (IDEA)
- ॲस्ट्रल (ASTRAL)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.