अर्थविश्व

ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवणारी 'फायकाॅमर्स'

- सलील उरुणकर

रिझर्व्ह बँकेने 'टोकन' पद्धतीचा (Tokenisation) अवलंब करण्यास या व्यापारी व कंपन्यांना सांगितले आहे. हे टोकन म्हणजे प्रत्येक ग्राहकाच्या कार्डचा क्रमांक किंवा माहितीसाठी असलेला पर्यायी संकेतांक (alternate code).

नेटफ्लिक्स, स्विगी, अॅमेझाॅन किंवा तत्सम कोणत्याही आॅनलाईन सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचा डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा क्रमांक सेव्ह करून ठेवला असेल... त्यामुळे प्रत्येक वेळी व्यवहार करताना तुम्हाला फक्त ओटीपी टाकून किंवा पिन क्रमांक टाकून काही सेकंदातच तो व्यवहार पूर्ण करता येतो. मात्र १ जानेवारी २०२२ पासून किंवा तत्पूर्वीच तुम्हाला नवीन पर्याय मिळणार आहे.. तो म्हणजे तुमच्या कार्डची माहिती अन्य कोणाकडेही (व्यापारी, आॅनलाईन मर्चंट, पेमेंट गेटवे किंवा पेमेंट अॅग्रीगेटर कंपन्या) साठवून न ठेवता हे व्यवहार करता येतील.

रिझर्व्ह बँकेने 'टोकन' पद्धतीचा (Tokenisation) अवलंब करण्यास या व्यापारी व कंपन्यांना सांगितले आहे. हे टोकन म्हणजे प्रत्येक ग्राहकाच्या कार्डचा क्रमांक किंवा माहितीसाठी असलेला पर्यायी संकेतांक (alternate code). या निर्णयामुळे डिजिटल पेमेंट इकोसिस्टिममध्ये (Digital Payment Ecosystem) खूप मोठे बदल होणार आहेत. आरबीआयच्या या निर्णयाची अंमलबजावणी मागील वर्षीच होणार होती, मात्र व्यापारी व कंपन्यांच्या मागणीनुसार त्याला मुदतवाढ देण्यात आली. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी आज ना उद्या होणारच असल्याने व्यापारी व कंपन्यांनी त्यांच्या बाजूने तयारी सुरू केली आहे. हे बदल प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सज्ज असलेल्या भारतातील काही निवडक स्टार्टअप्स पैकी एक म्हणजे पुण्यातील फायकाॅमर्स (PhiCommerce) ही वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी

कॅश नाही... डिजिटल पेमेंट आॅन डिलिव्हरी

जोस थत्तील (Jose Thattil), तुषार शंकर (Tushar Shankar), अनिल शर्मा (Anil Sharma), राजेश लोंढे (Rajesh Londhe) आणि रामकुमार सुब्बराज (Ramkumar Subbaraj) या चौघांनी मार्च २०१५ मध्ये फायकाॅमर्स स्टार्टअप कंपनीची स्थापना केली.

मुंबई विद्यापीठातून बीई इलेक्ट्राॅनिक्सचे शिक्षण घेतलेल्या जोस यांनी नंतर १९९७ मध्ये मॅनेजमेंट स्टडिज या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. आयसीआयसीआय बँकेमध्ये तंत्रज्ञान विभागाचे सहायक उपाध्यक्ष म्हणून रुजू होत त्यांनी आपल्या करिअरची सुरवात केली. भारतामध्ये व्हिसा डेबिट कार्डचे लाँच त्यांच्या कार्यकाळात झाले.

जोस म्हणाले, "डेबिट कार्डच्या लाँचच्या निमित्ताने मला पेमेंट क्षेत्रातील मूलभूत गोष्टी समजल्या. त्यानंतर मी पुण्यातील इलेक्ट्राकार्ड सर्व्हिसेस (ElectraCard Services) या कंपनीमध्ये रुजू झालो. ही कंपनी २०१३ मध्ये मास्टरकार्डने विकत घेतली. त्यानंतर २०१५ मध्ये मी आणि माझ्या मित्रांनी मिळून फायकाॅमर्स सुरू करण्याचे ठरविले. तेव्हा ई-काॅमर्स क्षेत्रात झपाट्याने वाढ होत होती आणि भारतामध्ये कॅश आॅन डिलिव्हरीचा पर्याय मोठ्या प्रमाणावर स्वीकारला जात होता. त्यामुळे डिजिटल व्यवहारातील एक महत्त्वाचा टप्पा पारंपरिक पद्धतीनेच होत होता. हा टप्पासुद्धा डिजिटल पद्धतीने होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला."

एक व्यवहार, अनेक भागीदार
फायकाॅमर्सने पे-फाय हा प्लॅटफाॅर्म विकसित केला. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, क्यूआर कोड, मोबाईल किंवा वाॅलेट आधारित पेमेंट, बायोमेट्रिक पेमेंट तसेच इंटरनेट आॅफ थिंग्ज (आयओटी) आधारित पेमेंट अशा कोणत्याही स्वरुपाच्या आणि कोणत्याही प्लॅटफाॅर्मवर वापरले जाऊ शकेल अशी सुविधा या स्टार्टअपने ग्राहकांना दिली.

जोस म्हणाले, "जगभरात आॅनलाईन-आॅफलाईन-आॅनलाईन असा ट्रेंड सध्या पाहायला मिळत आहे. केवळ पैशाची देवाण-घेवाण यापुरता विचार न करता पेमेंटची प्रक्रिया ही ग्राहकांच्या दृष्टीकोनातून सुरवातीपासून शेवटपर्यंत समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या पेमेंटच्या पद्धती आणि सवयी बदलतात. त्यानुसार सुविधा देणे गरजेचे असते. केवळ ग्राहकच नव्हे तर व्यापाऱ्यांच्या, ई-काॅमर्स कंपन्यांच्या दृष्टीकोनातूनही पेमेंटची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे असते. केवळ पैसे जमा होणे किंवा वजा होणे एवढ्यापुरते हे काम मर्यादित नसते. ग्राहकांकडून मिळालेल्या रकमेचा एक हिस्सा विक्रेत्याला, एक हिस्सा लाॅजिस्टिक सेवा पुरविणाऱ्या कंपनीलाही जातो. त्यामुळे एका व्यवहारात अनेक भागीदार असतात."

नोटबंदी आणि कोव्हिडचा परिणाम

फायकाॅमर्सची स्थापना झाल्यापासून तीन महत्त्वाच्या गोष्टी आतापर्यंत घडल्या आहेत. २०१६ मध्ये नोटबंदी, २०२० मध्ये कोव्हिड महामारीचा उद्रेक आणि याचसुमारास डायरेक्ट-टू-कस्टमर (डी२सी) कंपन्यांची भरभराट.

जोस यांच्या विश्लेषणानुसार नोटबंदीमुळे सर्वांना एका गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे रोख रकमेतील व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहारांकडे जाणे आपल्यासाठी आवश्यक आहे. मात्र, कोव्हिड महामारीचा उद्रेक आणि त्यापाठोपाठ लागू झालेल्या लाॅकडाऊनमुळे डिजिटल व्यवहार आणि डिजिटल जीवनशैली स्वीकारणे आपल्याला भाग पडले. देशातील अगदी दुर्गम खेड्यातूनही आता आधार-आधारित व्यवहार होत आहेत. घरगुती गॅसची नोंदणी अशा ग्रामीण भागातून होत असल्याचे आम्हाला दिसत आहे. यापूर्वी हे घडले नव्हते."

डिजिटल पेमेंट क्षेत्र विस्तारत असले तरी सध्या भारतात फक्त २५ टक्के व्यवहार डिजिटल स्वरुपात होत आहेत. अद्यापही ७५ टक्के ग्राहक हे रोख रकमेद्वारे पेमेंट करत आहेत. त्यामुळे पुढील आठ ते दहा वर्षात पेमेंट सोल्यूशन क्षेत्रात भरपूर वाढ होण्यासाठी वाव आहे, असेही जोस यांनी सांगितले.

फायकाॅमर्सच्या टीममध्ये सध्या ४५ जण काम करतात. नजिकच्या भविष्यात ही स्टार्टअप कंपनी आफ्रिकन देशात तसेच दक्षिण-पूर्व आशियाई देशात आपला व्यवसाय विस्तार करणार आहे. फायकाॅमर्सच्या प्लॅटफाॅर्मवरून दररोज पाच लाख व्यवहार होत असून या कंपनीमध्ये आतापर्यंत ५० लाख अमेरिकन डाॅलर एवढी गुंतवणूक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT