स्टरलाइट पॉवर ट्रान्ससमिशन ही कंपनी1,250 कोटी रुपयांचा IPO आणण्याच्या तयारीत आहे.
पुणे: स्टरलाइट पॉवर ट्रान्ससमिशन (Sterlite Power Transmission)ने आपल्या प्रस्तावित आयपीओसाठी (IPO)सेबीमध्ये draft red herring prospectus (DRHP)दाखल केले आहे. ही कंपनी अनिल अग्रवाल यांची प्रोमोटेड कंपनी आहे. स्टरलाइट पॉवर ट्रान्ससमिशन ही कंपनी1,250 कोटी रुपयांचा IPO आणण्याच्या तयारीत आहे.
कोण आहेत प्रमोटर्स :
स्टरलाइट पॉवर ट्रान्ससमिशनचे (Sterlite Power Transmission)प्रमोटर अनिल अग्रवाल आणि ट्विन स्टार ओवरसीज (Twin Star Overseas)आहेत. आयपीओच्या आधी 220 कोटी रुपयांचा pre-IPO placement आणण्याच्या प्रस्तावावर देखील विचार करणार असल्याचे कंपनीने सांगितले. असे प्लेसमेंट झाल्यास, IPOअंतर्गत जारी करण्यात येणाऱ्या शेअर्सची संख्या कमी केली जाऊ शकते.
आयपीओमधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कशासाठी?
आयपीओमधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कंपनी आणि Khargone Transmission Limited (KTL) कडून कर्ज फेडण्यासाठी केला जाणार आहे. कंपनीने या आयपीओसाठी Axis Capital, ICICI Securitiesआणि JM Financial ला बुक रनिंग लीड मॅनेजर नियुक्त केले आहे. तर KFin Technologies आयपीओचे रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत. आयपीओचा (IPO) काही भाग हा कर्मचाऱ्यांसाठी राखीव असणार आहे. कंपनीचे शेअर्स BSEआणि NSE दोन्हीवर लिस्ट होणार आहेत.
कुठे आहेत इन्फ्रा असेट्स?
स्टरलाइट पॉवर ट्रान्ससमिशन (Sterlite Power Transmission)कंपनी आपल्या दोन युनिट्सच्या मदतीने इंटिग्रेटेड पॉवर ट्रान्समिशन इंफ्रास्ट्रक्चर सॉल्युशन सारख्या सेवा देते. कंपनीजवळ भारत आणि ब्राझिलमध्ये पॉवर इंफ्रास्ट्रक्चर असेट्स आहेत. कंपनीची ग्लोबल इंफ्रा बिझनेस यूनिट पॉवर ट्रान्समिशन असेट्सचे डिझायनिंग, कंस्ट्रक्शन आणि ऑपरेशनचे व्यवसाय आहेत.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.