stock market crash amid russia ukraine war sensex breaks more than 1491 points Nifty fell more than 353 points  
अर्थविश्व

निफ्टी सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर, सेन्सेक्स 1491 अंकांनी कोसळला

सकाळ डिजिटल टीम

रशिया-युक्रेनचे युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या ऐतिहासिक वाढीचा फटका आज भारतीय शेअर बाजाराला बसला. सेन्सेक्स तब्बल 1491.06 अंक म्हणजेच तब्बल 2.74 टक्यांनी कोसळून 52 842 पातळीवर बंद झाला. तर निफ्टीही तब्बल 353 अंकांनी म्हणजेच 2.18 टक्क्यांनी कोसळून दिवसअखेर 15891.90 पातळीवर बंद झाला. जुलै 2021 नंतर पहिल्यांदाच निफ्टीने इतका निचांक गाठला.

गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांहून अधिक

बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत असून. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवल 2,46,79,421 कोटी रुपये होते. त्याच वेळी, सोमवारी बाजार उघडताच, सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवल सुमारे 2,40,78,200 कोटींवर आले आहे. अशाप्रकारे गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी देखील मोठी घसरण

याआधी शुक्रवारीही शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 366 अंकांनी (0.66%) घसरून 55,102 वर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 108 अंकांनी (0.55%) घसरून 16,498 वर बंद झाला होता.

सोन्याच्या किंमतीतही मोठी वाढ

आज सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आज वायदा बाजारात (MCX) सकाळी 10 वाजता, सोने 991 रुपयांच्या वाढीसह 53,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होते. त्याचवेळी चांदीचा भावही 1,679 रुपयांवर पोहोचला असून तो 70,965 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.

डॉलरने गाठला सर्वकालीन उच्चांक

आज रुपया डॉलरच्या तुलनेत 77 पैशांच्या कमजोरीसह 76.93 रुपयांवर उघडला. त्याच वेळी, शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 25 पैशांच्या घसरणीसह 76.16 रुपयांवर बंद झाला. या वर्षात आतापर्यंत रुपया 3.60% ने घसरला आहे. रुपया या वर्षी 3.60% ने घसरला आहे आणि डॉलरच्या तुलनेत 77.02 च्या आजीवन नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, रुपया 78 च्या पातळीवर जाऊ शकतो.

कच्च्या तेलाने 14 वर्षांचा विक्रमी उच्चांक गाठला

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोमवार, 7 मार्च, 2022 रोजी पहाटे, ब्रेंट क्रूडची किंमत जागतिक बाजारात $130 च्या वर गेली. यापूर्वी 2008 मध्ये कच्च्या तेलाने 128 डॉलरचा आकडा गाठला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT