share market Sakal
अर्थविश्व

Share Market Closing : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण

सेन्सेक्सने 70 अंकांची घसरण नोंदवली आणि बाजार 60,836 च्या पातळीवर बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Close : सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण होत आहे. सेन्सेक्सने 70 अंकांची घसरण नोंदवली आणि बाजार 60,836 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी 18,000 च्या वर बंद झाला. त्यात 30 अंकांची घसरण नोंदवून 18,052 च्या पातळीवर बंद झाला. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या वाढीचा परिणाम काही प्रमाणात बाजारावर दिसून आला. स्टेट बँक, टायटन, यूपीएल, बजाज ऑटो आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे टॉप-5 शेअर्स वाढले आहेत. टेक महिंद्रा, हिंदाल्को, पॉवरग्रिड, आयशर मोटर आणि एनटीपीसी या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

जर आपण क्षेत्रीय निर्देशांकावर नजर टाकली तर, बँक निफ्टी खालच्या स्तरावरून 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे. आज आयटी निर्देशांकात घसरण झाली,  मेटलच्या शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणावर घसरणीसह बाजार बंद झाला. ऑटो, फार्मा आणि कंझ्युमर ड्युरेबल्सचे शेअर्स घसरणीसह बाजार बंद झाले.

आज सेन्सेक्समधील 30  शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढले तर 16 शेअर्स घसरले. एसबीआय, टायटन, भारती एअरटेल, एचयूएल, इंडसइंड बँक, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, मारुती आणि एचसीएल टेक सेन्सेक्समधील आजच्या वाढीमध्ये घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT