Stock Market  google
अर्थविश्व

Stock Market : या स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, अडीच वर्षात तिप्पट परतावा...

गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या स्टॉकने गेल्या अडीच वर्षांत गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

नमिता धुरी

मुंबई : गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेड (GAEL) या कृषी उत्पादने बनवणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या स्टॉकने गेल्या अडीच वर्षांत गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लिमिटेड ही कंपनी भारतातील खाद्यतेल उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक आहे. रिफाइंड सोयाबीन तेल, रिफाइंड पाम तेल, रिफाइंड आरबीडी पामोलिन आणि रिफाइंड कॉटन सीड, स्टार्च आणि डेरिव्हेटिव्ह्ज - माल्टो डेक्स्ट्रिन, माल्टो डेक्स्ट्रिन, डेक्स्ट्रिन, डेक्स्ट्रोज मोनोहायड्रेट इ. सारखी उत्पादने निर्यात करतात.

कंपनीकडे गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात 4,600 टीपीडीच्या एकत्रित क्षमतेसह अत्याधुनिक उत्पादन सुविधा आहेत. याशिवाय, कंपनीचे हिंमतनगर, सितारगंज, हुबळी आणि चाळीसगाव यांसारख्या मोक्याच्या ठिकाणीही प्लांट्स आहेत. गेलच्या प्रमुख ग्राहकांमध्ये डाबर, मॉंडेलेझ, एशियन पेंट्स, नेस्ले, एचयूएल आणि पार्ले यांचा समावेश आहे.

मंगळवारी हे शेअर्स 231.45 रुपयांवर व्यवहार करत होते. गेल्या अडीच वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास 300 टक्के अधिक आहे. 27 मे 2020 रोजी हा शेअर 58 रुपयांवर होता आणि अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. बीएसईवर या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 393.85 रुपये आणि निचांक 151 रुपये आहे.

आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 6.43% ने घसरून 1077.77 कोटी झाला आणि पीएटी अर्थात प्रॉफीट आफ्टर टॅक्स 37.8% ने घसरून 64.10 रुपयांवर आला. कंपनीने 5,307 कोटीच्या बाजार भांडवलासह अनुक्रमे 25% आणि 30% आरओई आणि आरओसीई दिले आहेत.

मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT