Stocks to Buy Sakal
अर्थविश्व

27 रुपयांच्या 'या' स्टॉकने 7 वर्षांत एका लाखाचे केले 87 लाख...

गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये सुमारे 86,680 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शिल्पा गुजर

शेअर बाजारात संयम ही एकच गोष्ट तुम्हाला लाखो कमावून देऊ शकते. कारण फक्त शेअर्सची खरेदी-विक्री करून पैसे मिळत नाहीत. चांगले शेअर्स विकत घेतल्यानंतर, जर तुम्ही त्यात जास्त काळ टिकून राहिलात तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये खूप पैसे कमवू शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अदानी ट्रान्समिशनचा स्टॉक (Adani Transmission) आहे. या शेअरची मागच्या 7 वर्षांतली कामगिरी पाहिली, तर तुम्हाला लक्षात येईल आम्ही असे का म्हणत आहोत.

अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) 2021 चा मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय गेल्या 7 वर्षांच्या प्रवासावर नजर टाकल्यास लक्षात येते की हा शेअर 27.60 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये सुमारे 86,680 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शेअरच्या किंमतीचा इतिहास

गेल्या 1 महिन्यात, अदानी ट्रान्समिशनच्या शेअरची किंमत 2032 रुपयांवरून 2420 पर्यंत वाढली आहे. एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 1578 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत वाढला आहे. या स्टॉकने 6 महिन्यांत सुमारे 55 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, या स्टॉकने गेल्या वर्षभरात सुमारे 190 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या 5 वर्षांत अदानी समूहाचा हा मल्टीबॅगर स्टॉक 81.35 रुपयांवरून 2420 रुपयांपर्यंत कमालीचा वाढला आहे. 5 वर्षांत हा शेअर सुमारे 3670 टक्क्यांनी वाढला आहे. 31 मार्च 2015 ला हा स्टॉक NSE वर 27.60 रुपयांवर बंद झाला तर 24 मार्च 2022 ला हाच स्टॉक NSE वरच 2420 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच 7 वर्षांच्या कालावधीत हा स्टॉक 87.7 पट वाढला.

छप्परफाड परतावा- जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 1.20 लाख रुपये मिळाले असते. दुसरीकडे, 6 महिन्यांपूर्वी एखाद्याने या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 1.55 लाख रुपये मिळाले असते. तसेच 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 37.70 लाख रुपये मिळाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने 7 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 87.70 लाख रुपये झाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT