stock market esakal
अर्थविश्व

2022 मध्ये 'हे' 3 स्टॉक्स मल्टीबॅगर पेनी स्टॉक बनू शकतात

शिल्पा गुजर

वर्ष 2021 मध्ये अनेक पेनी स्टॉक मल्टीबॅगर ठरले. तज्ज्ञांच्या मते, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक आहे कारण स्टॉकमध्ये कमी लिक्विडिटीमुळे अस्थिरता निर्माण होते. पण जर एखाद्या लहान कंपनीचे फंडामेंटल मजबूत असतील, तर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळू शकतो.

चॉईस ब्रोकिंगच्या सुमीत बगाडिया यांनी 3 पेनी स्टॉक सुचवले आहेत जे मल्टीबॅगर परतावा देऊ शकतात:

1] सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy): मंथली चार्टवर, सुझलॉन एनर्जी स्टॉकने पाच महिन्यांचा ब्रेकआउट दिला आहे आणि जुलै 2021 मध्ये तयार केलेल्या 9.45 रुपयांच्या पूर्वीच्या उच्चांकाच्यावर राहिला आहे.
सुझलॉन एनर्जीमध्ये 10 रुपये किंवा 8 रुपयांवर गुंतवणूक करत 15 आणि 20 रुपयांसाठी टारगेट ठेवण्याचा सल्ला बगाडियांनी दिला. त्याची सपोर्ट लेव्हल 6 रुपयांवर आहे ज्यावर स्टॉपलॉस ठेवता येईल असा सल्ला त्यांनी दिला.

2] आयएफसीआय (IFCI): मंथली चार्टवर, आयएफसीआय (IFCI) स्टॉकने सहा महिन्यांचे कंसोलिडेशन ब्रेकआउट दिला आहे. आता 16 रुपये 40 पैशांच्या आधीच्या उच्च पातळीवर गेला आहे.
IFCI शेअर्समध्ये सध्या 25 ते 30 रुपयांचे टारगेट दिसत आहे, त्यामुळे 16 किंवा 14 रुपयांवर हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आगे. 11 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवा असेही ते म्हणाले.


3] व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea): मंथली चार्टवर व्होडाफोन - आयडियाच्या शेअर्सने 13.50 रुपयांचा रझिस्टंस लेव्हलचा ब्रेकआउट दिला आहे. डेली चार्टवर, सिमिट्रिकल ट्रायांगल लाइन फॉर्मेशनवर ब्रेकआउट दिले आहे, जो येत्या काळात तेजीचा संकेत देत आहे.
हे शेअर्स 14 किंवा 13 रुपयांवर खरेदी करा असे बागडिया म्हणाले. येत्या काळात यात 20 ते 25 रुपयांचे टारगेट दिसत असल्याची माहिती त्यांनी दिली. तर 10 रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्लाही दिला आहे. यावर्षी 5G रोलआउटनंतर त्यात 28 ते 30 रुपयांची पातळी दिसून येऊ शकते असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT