Stock Market Recommendation Sakal
अर्थविश्व

फार्मा सेक्टरमधील 'या' स्टॉकमध्ये येत्या काळात तेजी येण्याची शक्यता!

या स्टॉकमध्ये शॉर्ट टर्मसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात.

शिल्पा गुजर

या स्टॉकमध्ये शॉर्ट टर्मसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात.

शेअर बाजारात (Share Market) चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यास कधी वाया जात नाहीत हा इतिहास आहे. हेच चांगले शेअर्स नेमके कोणते याची ओळख शेअर मार्केट तज्ज्ञ दररोज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आताही शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी तुमच्यासाठी मजबूत शेअर्स आणले आहेत. या स्टॉकमध्ये शॉर्ट टर्मसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी गुफिक बायोसायन्सेसची (Gufic Biosciences) निवड केली आहे. ही कंपनी हर्बल उत्पादने बनवते. शॉर्ट टर्मसाठी हे शेअर्स तुम्हाला चांगला परतावा देतील असा विश्वास त्यांना आहे.

मागच्या काही दिवसांत मिडकॅप, स्मॉलकॅपसारखे शेअर्स निचांकी पातळी गाठत होते तेव्हा हा एकमेव स्टॉक होता जो त्याच्या 200 डॅमला सपोर्ट करत होता.

गुफिक बायोसायन्सेस (Gufic Biosciences)

- सीएमपी (CMP) - 211.55 रुपये

- टारगेट (Target) - 250 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स?

कंपनीचे फंडामेंटल्स उत्कृष्ट आहेत. कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 29 टक्के आहे. कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 18-19 टक्के आहे. कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये 15 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर डिसेंबर 2021 मध्ये 21 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता. या शेअर्समध्ये प्रमोटर्सची 75 टक्के भागीदारी आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

Latest Maharashtra News Updates live : पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

Raj Thackeray: एकदा सत्ता माझ्या हातात द्या, मशिदींवरील भोंगे ४८ तासांत उतरवू

Snapchat New Feature : खुशखबर! स्नॅपचॅटमध्ये आलं भन्नाट फीचर; तुम्ही पाहिलं काय?

Michael Waltz : मायकेल (माइक) वाल्ट्झ- `इंडिया कॉकस’ व भारत

SCROLL FOR NEXT