आजच्या काळात शिक्षण महाग झाले आहे.
आजच्या काळात शिक्षण (Education) महाग झाले आहे, त्यामुळे अनेकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही. अशावेळी बँकांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज (Education Loan) दिले जाते. जेणेकरून विद्यार्थी आपला अभ्यास पूर्ण करू शकेल. याशिवाय अनेकांना कर्ज घ्यायचं नसतं, अशा पद्धतीने ते आपल्या पीएफचे (PF) पैसे किंवा गुंतवणुकीचे पैसे काढून मुलाला शिकवतात.
विद्यार्थ्यांच्या क्रेडिट कार्डबद्दल येथे सांगितलं जात आहे, जी मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज किंवा पीएफमधून पैसे काढण्यापेक्षा अधिक चांगला पर्याय असू शकते. विद्यार्थी क्रेडिट कार्ड (Student Credit Card) बनविण्याचा पर्याय प्रमुख बँकांकडून दिला जातो. SBI, HDFC आणि ICICI बँक यांनी विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड बनविण्याची परवानगी दिली आहे, जी पालकांना लागू केली जाऊ शकते.
स्टुडंट क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
विद्यार्थ्यांच्या पॉकेटमनी, महिन्याचा खर्च, विविध प्रोजेक्टमध्ये लागणाऱ्या वस्तूंची खरेदी आणि फी जमा करणे आदी खर्चासाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षण खर्चाचे पालकांवरील ओझे कमी होऊ शकते. या क्रेडिट कार्डमध्ये तुम्हाला वेळेत पेमेंट केल्यावर कोणतंही व्याज द्यावं लागत नाही. मात्र, कॉलेज किंवा इतर कोणतीही तांत्रिक पदवी घेत असलेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांनाच ती दिली जाते.
कोणत्या कागदपत्रांची गरज आहे?
विद्यार्थ्याचे क्रेडिट कार्ड बनविण्यासाठी विद्यार्थ्याचे पॅनकार्ड, कॉलेज आयडी आणि पर्सनल आयडी प्रुफ आवश्यक आहे. यासोबतच पॅरेंट आयडीही आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.