sugar stock sakal
अर्थविश्व

Sugar Stock: Ugar Sugarsने दिला एका वर्षात 160% परतावा, आणखी तेजी येणार

नुकतेच या स्टॉकने बीएसईवर इंट्राडेमध्ये 12 टक्क्यांच्या मजबूत तेजीसह 79 रुपयांची पातळी गाठली.

सकाळ डिजिटल टीम


उगार शुगर वर्क्सच्या (Ugar Sugars) शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत चांगली तेजी दिसून येत आहे. नुकतेच त्याने बीएसईवर इंट्राडेमध्ये 12 टक्क्यांच्या मजबूत तेजीसह 79 रुपयांची पातळी गाठली. शुगर कंपनीच्या स्टॉकचा हा सहा महिन्यांचा उच्चांक आहे.

25 मार्चला उगार शुगर्सच्या स्टॉकने 86.50 रुपयांचा उच्चांक गाठला होता. गेल्या सात दिवसांत शेअरमध्ये 32 टक्क्यांची मजबूत तेजी दिसून आली आहे. कंपनीला 645 किलोलिटर प्रतिदिन (KLPD) डिस्टिलरी चालवण्यास मान्यता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेअर्समध्ये वाढ झाली.

155 टक्के रिटर्न
गुरुवारी हा शेअर 7.84 टक्क्यांनी मजबूत होऊन 76.20 रुपयांवर ट्रे़ड करत होता. गेल्या एका वर्षात या स्टॉकने सुमारे 160 टक्के तेजी नोंदवली आहे, तर याच काळात एस अँड पी बीएसई सेन्सेक्स 6 टक्क्यांनी घसरला आहे. 2022 मध्ये स्टॉकने 155% परतावा दिला आहे.

उगार प्लांटमध्ये 645 KLPD डिस्टिलरी बसवण्याचे काम पूर्ण केल्याचे कंपनीने सांगितले. देशांतर्गत बाजारपेठेतील स्थिर भाव, साखरेची चांगली निर्यात, इथेनॉलकडे डायव्हर्जन या गोष्टी लक्षात घेऊन साखर क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म आउटलुक चांगला दिसत आहे. येत्या काही वर्षांत इथेनॉलचा पुरवठा आणि निर्यात या उद्योगासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT