Nifty Sakal
अर्थविश्व

स्मार्ट गुंतवणूक : ‘निफ्टी अल्फा ५० ईटीएफ’

‘निफ्टी अल्फा ५०’ हा असा एक निर्देशांक अर्थात ‘इंडेक्स’ आहे, ज्यामध्ये जरी ५० कंपन्यांचे शेअर असले तरीही हा ‘निफ्टी ५०’ पेक्षा वेगळा निर्देशांक आहे.

सुहास राजदेरकर

‘निफ्टी अल्फा ५०’ हा असा एक निर्देशांक अर्थात ‘इंडेक्स’ आहे, ज्यामध्ये जरी ५० कंपन्यांचे शेअर असले तरीही हा ‘निफ्टी ५०’ पेक्षा वेगळा निर्देशांक आहे. यातील ‘अल्फा’ हा शब्द महत्त्वाचा आहे. ‘अल्फा’ म्हणजे काय ते थोडक्यात पाहू.

बाजाराने दिलेल्या परताव्यापेक्षा किंवा अपेक्षेपेक्षा जो काही ‘जास्तीचा’ (अधिक) परतावा एखादा शेअर देतो, त्याला ‘अल्फा’ असे म्हणतात.

समजा, बाजाराने तीन वर्षांमध्ये १८ टक्के परतावा दिला आहे. परंतु, ‘इन्फोसिस’च्या शेअरने ३८ टक्के परतावा दिला असेल, तर ‘इन्फोसिस’ने (३८-१८) २० टक्के ‘अल्फा’ दिला आहे, असे म्हणता येईल. ‘निफ्टी अल्फा ५०’ निर्देशांक कसा तयार होतो ते पाहू. यामध्ये बाजारमूल्यांप्रमाणे सर्वांत वरच्या फक्त ३०० कंपन्यांचा विचार केला जातो. यामध्ये ज्या शेअरने सर्वांत जास्त ‘अल्फा’ दिला आहे, त्याला सर्वांत जास्त वजन (वेटेज) अथवा गुण दिले जातात. शेअरच्या वजनानुसार, सर्वांत जास्त वजनाचे ५० शेअर या निर्देशांकामध्ये सामील केले जातात. हे करताना, मागील एका वर्षाच्या किमती विचारात घेतल्या जातात. त्यामुळे, शेअर किमान एक वर्ष तरी सूचिबद्ध असला पाहिजे. मागील एका वर्षात शेअरची तरलता अधिक असणे सुद्धा आवश्यक आहे. दर तीन महिन्यांनी या निर्देशांकाचे परीक्षण (रिव्ह्यू) केले जाते आणि काही बदल आवश्यक असतील तर ते केले जातात.

याच निर्देशांकावर आधारीत कोटक म्युच्युअल फंडाने, ‘कोटक निफ्टी अल्फा ५० ईटीएफ’ ही योजना बाजारात आणली असून, ती येत्या १५ डिसेंबर रोजी बंद होणार आहे. अशा संकल्पनेची भारतातील ही पहिलीच योजना आहे.

योजनेचे फायदे काय आहेत?

  • या निर्देशांकामध्ये विविध विभागातील कंपन्यांचे शेअर आल्यामुळे योजना कोणत्याही एका विभागाकडे अतिरिक्त झुकत नाही. योजनेमध्ये विविधता येते.

  • ही एक पॅसिव्ह योजना असल्याने कोणते शेअर आणि किती घ्यायचे ते आपोआप ठरते आणि फंड व्यवस्थापकांचा पूर्वग्रह मधे येत नाही.

  • ही एक ईटीएफ योजना असल्याने, योजनेचा खर्च अतिशय कमी असणार आहे.

  • सोबत दिलेला तक्ता दाखवितो, की ‘निफ्टी अल्फा ५० इंडेक्स’ने ‘निफ्टी ५०’ पेक्षा खूपच अधिक परतावा दिला आहे.

योजनेमधील जोखीम काय आहे?

  • मुळातच ही एक इक्विटी योजना असल्याने बाजारातील अस्थिरतेची जोखीम या योजनेमध्ये येतेच.

  • जरी एखादी कंपनी ईएसजी अर्थात एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स संकल्पनेचे पालन करीत नसेल तरीसुद्धा अशा कंपनीचा शेअर योजनेमध्ये असू शकतो.

  • बाजारमूल्यांप्रमाणे फक्त वरील ३०० कंपन्यांचाच विचार केला जात असल्याने, बहुतेक मिड आणि स्मॉल कॅप शेअर, चांगली कामगिरी करीत असले तरीही या योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत.

  • योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते अनिवार्य आहे. गुंतवणूकदारांना नवी फंड ऑफर संपली, की पुढील खरेदी-विक्री दुय्यम बाजारामधूनच करावी लागते. बाजारामध्ये तरलता नसेल तर गुंतवणूकदारांना पाहिजे तेव्हा पैसे काढण्यास अडचण येऊ शकते.

  • केवळ ‘अल्फा’वर भर दिल्यामुळे मूलभूत दीर्घकालीन चांगले शेअर बाजूला राहून तात्पुरते वर जाणारे शेअर घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तात्पर्य -

ही योजना एका वेगळ्या आणि चांगल्या निर्देशांकावर आधारीत आहे. असे असले तरीही वरील सर्व फायदे आणि जोखमींचा विचार करून आणि तज्ज्ञांच्या सल्याने यातील गुंतवणुकीचा विचार करणे योग्य राहील.

(लेखक म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हॅरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT