Tata Group Shares Sakal
अर्थविश्व

टाटा समूहाचा 'हा' स्टॉक स्वस्त, खरेदी करण्याची उत्तम संधी, तज्ज्ञांचा सल्ला

शिल्पा गुजर

Tata Group Stock: टाटा ग्रुपच्या टाटा कम्युनिकेशन्सच्या (Tata Communications) शेअरमध्ये घसरण होताना दिसत आहे. आज शेअर सुमारे 2.5 टक्क्यांनी कमजोर झाला आहे आणि त्याची किंमत 1411 रुपयांवर पोहोचली आहे. तर गुरुवारी तो 1,450 रुपयांवर बंद झाला. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्सचा नफा जवळपास 28 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या उत्पन्नात थोडीशी घट झाली आहे. सध्या, तिमाही निकालानंतर, ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे आणि 1680 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. शेअर 1 वर्षाच्या उच्चांकावरून 181 रुपयांनी खाली आला आहे.

टाटा कम्युनिकेशनच्या महसुलातील वाढ अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे. एक्स कोलाबोरेशन डिजिटल सर्व्हिसेस रेवेन्यू वार्षिक 21.3 टक्क्यांनी वाढला आहे. कोर कनेक्टिव्हिटीमध्ये महसूल वाढ केवळ 1.3 टक्के आहे, पण कंपनीला या विभागात 4 ते 5 टक्के वार्षिक वाढ अपेक्षित आहे. कंपनीत 2023 मध्ये 1000 हून अधिक जागांसाठी नवीन नियुक्ती केली जाणार आहे. तांत्रिक आणि विक्री विभागात सर्वाधिक भरती केली जाणार असल्याचे समजत आहे.

डील ऑर्डरबुक

टाटा कम्युनिकेशन्सची डील ऑर्डरबुक 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत अतिशय मजबूत होती, जी तिसऱ्या तिमाहीत थोडी कमी झाली. नेक्स्ट जेन कनेक्टिव्हिटीचा अवलंब करण्याचा फायदा कंपनीला मिळेल. ब्रोकरेज हाऊसने FY22E/FY23E साठी टाटा कम्युनिकेशन्सचा EBITDA अंदाज 4.7 टक्के आणि 2.4 टक्क्यांनी कमी केला आहे. मात्र, शेअरमध्ये खरेदीचे मत देत, 1680 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. यापूर्वी ब्रोकरेजने शेअरसाठी 1750 रुपयांचे टार्गेट ठेवले होते.

395 कोटी नफा

डिसेंबर तिमाहीत टाटा कम्युनिकेशन्सचा (Tata Communications) नफा वार्षिक 27.8 टक्क्यांनी वाढून 395.21 कोटी झाला आहे. यासह, कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 309.41 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 4,203.69 कोटी रुपये राहिले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT