tata steel 
अर्थविश्व

टाटा स्टीलची क्षमता वाढणार; कोट्यवधींच्या भांडवली खर्चाची योजना

सुमित बागुल

जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा स्टीलची देशातील क्षमता वाढवण्यासाठी चालू आर्थिक वर्षात 8,000 कोटी रुपयांचा भांडवली खर्च (Expenditure)केला जाईल.

नवी दिल्ली- जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा स्टीलची देशातील क्षमता वाढवण्यासाठी चालू आर्थिक वर्षात 8,000 कोटी रुपयांचा भांडवली खर्च (Expenditure)केला जाईल. या गुंतवणुकीतील मोठा हिस्सा ओडिशातील कलिंगनगर प्रकल्पाची क्षमता वाढवणे, खाणकाम आणि पुनर्वापर व्यवसाय (Recycling Business)वाढविणे यासाठी वापरला जाईल अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. व्ही. नरेंद्रन यांनी दिली. (Finance Latest News)

याशिवाय, कंपनी आपला युरोपियन व्यवसाय मजबूत करण्यासाठी आणि उत्पादनांची संख्या वाढवण्यासाठी 3,000 कोटी रुपये खर्च करीत आहे. आम्ही कच्च्या मालावरही खर्च करणार असल्याचे टी. व्ही. नरेंद्रन म्हणाले. कलिंगनगर प्रकल्पाच्या विस्तारात मदत करण्यासाठी लोह खनिज खाणकामदेखील वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कलिंगनगर प्रकल्पाची क्षमता वार्षिक50 लाख टन (MTPA)वाढवण्याची टाटा स्टीलची योजना आहे.

रिसायकलिंग प्लांट्स उभारण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता नरेंद्र म्हणाले की,कंपनी स्क्रॅपमध्ये वेगळ्या व्यवसाय मॉडेलवर (Business Model) चालते. यासाठी भागीदारी केली जाईल असेही ते म्हणाले. आमच्याकडे स्क्रॅपसाठी एक वेगळे व्यवसाय मॉडेल असल्याचे नरेंद्रन यांनी स्पष्ट केले. यात भागीदारांच्या वतीने एक प्लांट टाकला जातो. आम्ही गुणवत्ता राखतो आणि स्टील विकतो असेही ते म्हणाले.

स्क्रॅप अर्थात भंगारासाठी पश्चिम आणि दक्षिण प्रदेशांचा विचार करत असल्याचही नरेंद्रन म्हणाले, कारण या भागात मोठ्या प्रमाणात भंगार उपलब्ध आहे. रिसायकलिंग प्लांट्स तिथेच उभारले पाहिजे जिथे जास्त प्रमाणात भंगार असेल असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT