Lalit Gandhi sakal media
अर्थविश्व

GST करकपातीचे स्वागत; पादत्राणांवरही करसवलतीची मागणी

कृष्ण जोशी

मुंबई : तयार कपड्यांवरील जीएसटी दरात केलेली वाढ (GST rates increases on clothes) मागे घेण्याच्या जीएसटी काउंन्सिलच्या (GST council decision) आजच्या निर्णयाचे व्यापारी संघटनांनी (Traders union) स्वागत केले असून पादत्राणांवरील करवाढही (Footwear tax) मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (Tax relief demand on footwear to GST council)

एक जानेवारीपासून ही करवाढ होणार होती. या निर्णयामुळे देशभरातल्या कापड व पादत्राणांच्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. आजच्या या निर्णयाबद्दल 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' चे अध्यक्ष ललित गांधी यांनी समाधान व्यक्त केले. ही दरवाढ सध्या पुढे ढकलली असून ती कायमची रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे केंद्रीय अर्थमंत्री, वस्त्रोद्योगमंत्री यांच्यासह जीएसटी काउंन्सिल च्या देशातील सर्व राज्यांच्या सदस्य अर्थमंत्र्यांना निवेदन दिले होते. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही यासंबंधी केलेल्या प्रयत्नांबद्दलही गांधी यांनी त्यांचे विशेष आभार मानले. पादत्राणांवरील करवाढ मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

तर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. फेडरेशनने देखील हा निर्णय बदलावा यासाठी अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. देशातील सर्वच व्यापारी-व्यावसायिकांच्या संघटनांनी या निर्णयाचा फेरविचार व्हावा यासाठी धडपड केली होती. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांचे हे यश आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT