Tax Refund esakal
अर्थविश्व

करदात्यांनो, क्‍लेमपेक्षा रिटर्न कमी आला? 'हे' आहे कारण

1.27 कोटी करदात्यांना परतावा जारी! क्‍लेमपेक्षा रिटर्न कमी आला? 'हे' आहे कारण

सकाळ वृत्तसेवा

CBDT ने 1 एप्रिल ते 13 डिसेंबर या चालू आर्थिक वर्षात 1.27 कोटी करदात्यांना कर परतावा जारी केला आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes - CBDT) 1 एप्रिल ते 13 डिसेंबर या चालू आर्थिक वर्षात 1.27 कोटी करदात्यांना (Taxpayers) एकूण 1,36,779 कोटी रुपयांचा कर परतावा (Tax Refund) जारी केला आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) बुधवारी ट्‌विट करून ही माहिती दिली. (Taxpayers have received less returns than claims, creating confusion)

'CBDT ने 1 एप्रिल 2021 ते 13 डिसेंबर 2021 या कालावधीत 1.27 कोटी करदात्यांना 1,36,779 कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे', असे विभागाने म्हटले आहे. 1,25,34,644 प्रकरणांमध्ये 46,438 कोटी रुपयांचा आयकर परतावा देण्यात आला आहे, तर 2,02,705 प्रकरणांमध्ये 90,340 कोटी रुपयांचा कंपनी कर परतावा देण्यात आला आहे.

दाव्यापेक्षा परतावा कमी आहे का?

तुम्ही दावा केला त्यापेक्षा तुम्हाला कमी परतावा मिळाला आहे का? जर होय, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला कमी पैशांचा परतावा का मिळाला ते जाणून घ्या. प्राप्तिकर विभाग टप्प्याटप्प्याने पैसे परत करत आहे, परंतु दावा केल्याप्रमाणे रक्कम न मिळालेल्या लोकांची संख्या मोठी आहे. याचे कारण आयकर पोर्टलमध्ये (Income Tax Portal) काही तांत्रिक समस्या आहे. यामुळेच करदात्यांना हक्कापेक्षा कमी परतावा मिळाला आहे.

Tax2win.in चे सीईओ आणि सह-संस्थापक अभिषेक सोनी (Abhishek Soni) म्हणतात, आम्ही पाहिले आहे की जे करदाते फॉर्म योग्यरीत्या भरले आहेत, त्यांच्यापैकी काहींना हक्कापेक्षा कमी परतावा मिळाला आहे. विभाग लवकरच ही समस्या दुरुस्त करेल अशी आशा आहे. आयकर पोर्टलवर येणाऱ्या अडचणींमुळे आयटीआर दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT