Ipca Laboratories esakal
अर्थविश्व

शेअर बाजार तज्ज्ञांकडून Ipca Laboratoriesचे शेअर्स घेण्याचा सल्ला!

याशिवाय ही कंपनी एपीआय उत्पादन व्यवसायातही गुंतली आहे.

शिल्पा गुजर

येत्या 12 महिन्यांत आयपीसीए लेबोरेटोरीजच्या (Ipca Laboratories) स्टॉकमध्ये चांगली तेजी दिसेल, असा विश्वास एडलवाईस सिक्युरिटीजसह शेअर बाजार तज्ज्ञांना आहे.

एडलवाईस सिक्युरिटीजने (Edelweiss Securities)आयपीसीए लेबोरेटोरीजचे (Ipca Laboratories) शेअर्स 2530 रुपयांचे टारगेट ठेवत शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एडलवाईस सिक्युरिटीजचा असा विश्वास आहे की पुढील 12 महिन्यांत या स्टॉकद्वारे हे टारगेट अतिशय सहज पार करता येईल. सध्या हा शेअर 2036 रुपयांच्या आसपास आहे. आयपीसीए लेबोरेटोरीजचे (Ipca Laboratories)ही एक भारतीय फार्मास्युटिकल बहुराष्ट्रीय कंपनी आहे. याशिवाय ही कंपनी एपीआय उत्पादन व्यवसायातही गुंतली आहे.

कंपनीच्या R&D ला यशाचे श्रेय जाते. आयपीसीए लॅबोरेटरीजच्या व्यवस्थापनाला त्याच्या कार्डियाक थेरेपीसह, इतर विभागांमध्ये मजबूत वाढ अपेक्षित आहे. कंपनी आपला कार्डियाक थेरपी पोर्टफोलिओ आक्रमकपणे विकसित करत आहे. आयपीसीए लॅबोरेटरीजचा मागील ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला असल्याचे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे. कंपनीची बॅलेन्सशीट भक्कम आहे. त्यामुळे पुढे कंपनीच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. आयपीसीए लॅबोरेटरीजचा लाँग टर्म आउटलूक खूप मजबूत दिसत आहे. त्यामुळेच एडलवाईसने या स्टॉकला बाय रेटिंग कायम ठेवत 2530 रुपयांचे टार्गेट दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT