Post Office Term Deposit Scheme esakal
अर्थविश्व

Post Office ची 'ही' स्कीम बँकेपेक्षाही देते जास्त रिटर्न

या योजनेत तुमचे पैसे नेहमीच सुरक्षित असतील.

शिल्पा गुजर

या योजनेत तुमचे पैसे नेहमीच सुरक्षित असतील.

Post Office Term Deposit Scheme : पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची (Post Office) फिक्स्ड डिपॉजिट/टर्म डिपॉजिट (Fixed Deposit / Term Deposit) स्कीम बेस्ट आहे. या योजनेत तुमचे पैसे नेहमीच सुरक्षित असतील. FD/TD ची सुविधा फक्त बँकेतच नाही तर पोस्ट ऑफिसमध्येही आहे. फरक हा आहे की पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवलेले तुमचे पैसे नेहमीच सुरक्षित असतात आणि परतीची हमी देखील देतात.

तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 1 ते 5 वर्षांपर्यंत मुदत ठेव (Term Deposit) उघडू शकता. ही एक लहान बचत योजना (Small Savings Scheme) आहे. जानेवारी ते मार्च 2022 या तिमाहीत त्यांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. याचा अर्थ असा की जे व्याज ऑक्टोबर-डिसेंबर 2021 च्या तिमाहीत उपलब्ध होते, ते आताही मिळत राहील.

पोस्ट ऑफिस मुदत ठेवींमध्ये, 6.7 टक्के व्याज 5 वर्षांसाठी देत आहेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांच्या मुदतीच्या ठेवीमध्ये (Term Deposit) 1 लाख रुपये जमा करून खाते उघडले, तर 5 वर्षानंतर, त्याला TD च्या व्याज दरानुसार 1,39,407 रुपये मिळतील. त्याच वेळी, एक वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज दर वार्षिक 5.5 टक्के इतका आहे.

कोण खाते उघडू शकतो ?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणताही भारतीय स्वतः एकटा किंवा संयुक्त खाते (Joint account) उघडू शकतो. त्याच वेळी, ज्यांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असावे. एखादा मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तीही हे खाते सुरू करू शकतो. खाते उघडण्यासाठी तुम्ही त्यात 1000 रुपयांपासून कोणतीही रक्कम टाकू शकता. याशिवाय पोस्ट ऑफिस TD मध्ये 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते.

Premature Closing नियम

6 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही योजना बंद करू शकता. दुसरीकडे, तुम्ही या खात्याचे 12 महिने पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर TD बंद केल्यास, पोस्ट ऑफिस बचत योजनेचा (Savings Scheme) व्याज दर लागू होईल आणि मुदत ठेवीचा (Term Deposit) नाही.

पोस्ट ऑफिस TD मधील सुविधा

- यावर तुम्हाला नामांकन सेवा (Nomination Service) मिळेल

- पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या खात्यात खाते हस्तांतरित (Transfer) करण्याची सुविधा मिळेल

- पोस्ट ऑफिस एक, पण एकापेक्षा जास्त टीडी (Term Deposit) खाते सुरू करू शकता

- सिंगल अकाऊंटला जॉइंट किंवा जॉइंट अकाऊंटचे सिंगल अकाऊंट करता येईल

- खाते विस्तार (Account extention) सुविधा

- इंट्रा-ऑपरेबल नेटबँकिंग/मोबाइल बँकिंगद्वारे ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT