Share Market sakal media
अर्थविश्व

Share Market : 'या' स्टॉकने एका वर्षात दिला 177 टक्के परतावा!

गेल्या एका वर्षात या शेअर्सने 177 टक्के परतावा देत मल्टीबॅगर स्टॉकच्या लिस्टमध्ये समाविष्ट झाला.

शिल्पा गुजर

गेल्या एका वर्षात या शेअर्सने 177 टक्के परतावा देत मल्टीबॅगर स्टॉकच्या लिस्टमध्ये समाविष्ट झाला.

जिंदाल स्टेनलेस लिमिटेड (Jindal Stainless Ltd) ही भारतातील सर्वात मोठी स्टेनलेस स्टील उत्पादक कंपनी आहे. जिंदाल स्टेनलेस लिमिटेडची क्षमता वार्षिक 11 लाख टन आहे. गेल्या एका वर्षात या शेअर्सने 177 टक्के परतावा देत मल्टीबॅगर स्टॉकच्या लिस्टमध्ये समाविष्ट झाला. तर गेल्या सहा महिन्यांत या शेअरने जवळपास 32 टक्के परतावा दिला आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत केवळ 70.25 रुपये होता, जी 194.75 रुपये झाली आहे.

12 महिन्यांसाठी 250 रुपयांचे टारगेट

गेल्या एका वर्षात इतका चांगला परतावा मिळूनही, देशांतर्गत ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म ICICI सिक्युरिटीजने या शेअरला 'बाय' रेटिंग देऊन 12 महिन्यांत या स्टॉकसाठी 250 रुपयांचे टारगेट दिले आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी चांगली राहिली आहे.

तिसऱ्या तिमाहीच्या कमाईत 33 टक्क्यांनी वाढ

डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 4173 कोटी रुपये होते, जे वार्षिक तुलनेत 33 टक्क्यांनी वाढले आहे. कंपनीच्या उत्पन्नात तिमाही आधारावर 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिसर्‍या तिमाहीत, कंपनीच्या एकत्रित एबिटडाने (EBITDA)वर्षभरात 47 टक्क्यांची वाढ नोंदवली, तर नफा 90 टक्क्यांनी वाढून 515 कोटी रुपयांवर पोहोचला.

कंपनीच्या उत्पादन क्षमतेत वाढ

कंपनीने अलीकडेच विस्ताराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे, ज्यामुळे कंपनीची प्रिसीजन स्ट्रिप उत्पादन क्षमता 22000 TPA वरून 48000 TPA पर्यंत वाढली आहे. कंपनी विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यावरही काम करत आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर, त्याची प्रिसीजन स्ट्रिप उत्पादन क्षमता 60000 TPA च्या पातळीवर पोहोचेल.

ब्लेड उत्पादन क्षमतेवर 200 कोटींची गुंतवणूक

विस्ताराचा दुसरा टप्पा आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे ICICI सिक्युरिटीने सांगितले. कंपनी आपली ब्लेड उत्पादन क्षमता वाढवण्यावरही भर देत आहे. 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, कंपनी आपली ब्लेड उत्पादन क्षमता 14000 TPA वरून 24000 TPA पर्यंत वाढवणार आहे. हे घटक कंपनीच्या शेअरच्या किमतीत आणखी वाढ करण्यासाठी उपयोगी ठरतील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT