मजबूत फंडामेंटल्स असलेले हे शेअर्स गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये चांगला परतावा देऊ शकतात.
Best Midcap Stocks: मिडकॅप सेगमेंटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही चांगले स्टॉक शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ही यादी घेऊन आलो आहे. तज्ज्ञांना या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. मजबूत फंडामेंटल्स (Fundamentals) असलेले हे शेअर्स गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये चांगला परतावा देऊ शकतात. ज्या प्रकारे अर्थव्यवस्था (Economy) सुधारत आहे आणि देशांतर्गत मॅक्रो परिस्थिती सुधारत आहे, मिडकॅप कंपन्या पुढे जाऊन चांगले काम करतील. त्यामुळे त्यांचे शेअर्सही वाढतील अशी आशा आहे. या यादीत Huhtamaki PPL, RITES Ltd, Gulf Oil Lubricants, Century Enka, Bombay Burmah आणि Radico Khaitan यांचा समावेश आहे. या शेअर्सबाबत दिग्गज शेअर बाजार तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे पाहुयात.
जय ठक्कर यांची निवड
लॉन्ग टर्म: सेंच्युरी एंका (Century Enka)
जय ठक्कर यांनी सेंच्युरी एन्कामध्ये लाँग टर्ममध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 580 रुपयांचे टारगेट दिले आहे. तर 319 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
पोझिशनल : बॉम्बे बर्मा (Bombay Burmah)
जय ठक्कर यांनी बॉम्बे बर्मामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी 1363 रुपयांचे टारगेट ठेवण्यात आले आहे. तर रु. 997 वर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
शॉर्ट टर्म: रॅडिको खेतान (Radico Khaitan)
जय ठक्कर यांनी रॅडिको खेतानमध्ये शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 1350 ते 1400 रुपयांचे टारगेट ठेवण्यात आले आहे. तर 1015 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
अंबरिश बालिगा यांची निवड
लॉन्ग टर्म : हुहतामाकी पीपीएल (Huhtamaki PPL)
अंबरिश बालिगा यांनी हुहतामाकी पीपीएलवर लॉन्ग टर्मसाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 280 रुपयांचे टारगेट ठेवण्यात आले आहे. ही एक पॅकेजिंग आणि लेव्हलिंग कंपनी आहे आणि फार्मा आणि FMCG क्षेत्रात सेवा देते.
पोझिशनल : RITES Ltd
अंबरीश बालिगा यांनी RITES Ltd ची पोझिशनल निवड म्हणून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 324 रुपयांचे टारगेट ठेवण्यात आले आहे. सध्या 6400 कोटींची ऑर्डर बुक आहे. कंपनीचे अनेक मोठे प्रकल्प आहेत.
शॉर्ट टर्म: Gulf Oil Lubricants
अंबरीश बालिगा यांनी गल्फ ऑइल लुब्रिकंट्सवर शॉर्ट टर्मसाठी बाय रेटिंग दिले आहे. या स्टॉकसाठी 528 रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. साह यांची हिंदुजा ग्रुपची कंपनी आहे. हे एक मोठे ब्रँड नाव आहे. आगामी काळात कंपनीच्या मार्जिनमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.