Stock to buy : शेअर बाजार हे असे ठिकाण आहे जिथे एका दिवसात चांगली कमाई करता येते. पण अट अशी आहे की तुम्ही जे शेअर्स निवडाल त्याचे फंडामेंटल्स चांगले असले पाहिजेत. तुम्ही शेअर बाजारात (Share Market) चांगले आणि मजबूत फंडामेंटल्स असणारे शेअर्स शोधत असाल तर ब्रोकरेज फर्मने इंटरग्लोब एव्हिएशन (Interglobe Aviation), गेल (GAIL), अशोक लेलँडसारख्या (Ashok Leyland) शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये पैसे (Money) गुंतवल्यास 20 ते 40 टक्के परतावा मिळू शकतो, असे ब्रोकरेज कंपन्यांचे मत आहे.
इंटरग्लोब एव्हिएशन (Interglobe Aviation)- ब्रोकरेज फर्म यूबीएसने (UBS) इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने टारगेट किंमतही वाढवली आहे आणि ती 2280 रुपये केली आहे. कंपनीने ऑपरेशनल वाढ दर्शवली आहे शिवाय कंपनीचा मार्केट शेअरही वाढला आहे.
गेल (GAIL)- ब्रोकरेज फर्म UBS गेल (GAIL) स्टॉकचे रेटिंग वाढवले आहे आणि खरेदीसाठी टारगेट किंमत बदलली आहे. जेफरीजने होल्डवर खरेदी करण्याचा सल्ला देत टारगेट 160 रुपयांवरून 170 रुपये केले आहे. युरोपमधील जियोपॉलिटिकल डेव्हलेपमेंटमुळे एलपीजी गॅसच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो.
अशोक लेलँड (Ashok Leyland)- ब्रोकरेज कंपनी क्रेडिट सुईसने (Credit Suisse) अशोक लेलँड (Ashok Leyland) शेअरचे रेटिंग वाढवले आहे. हे रेटींग न्यूट्रलवरून वाढवून आऊटपरफॉर्म केले आहे. एवढेच नाही तर शेअर खरेदीसाठी टारगेट किंमतही वाढवली आहे. ही किंमत 135 रुपयांवरून 158 रुपये करण्यात आली आहे.
20-40% वाढ अपेक्षित- वेगवेगळ्या ब्रोकरेज कंपन्यांनी या तिन्ही शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यात 20 ते 40 टक्के परतावा मिळेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. शॉर्ट टर्म ते लाँग टर्मसाठी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळेल असेही सांगितले आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.