Share Market esakal
अर्थविश्व

Stock: या स्मॉल कॅप स्टॉकचा 3 वर्षात 111% परतावा, आता देणार 100% डिव्हिडेंड

गेल्या तीन वर्षांत या शेअरने 111.58 टक्के परतावा दिला आहे

सकाळ डिजिटल टीम

स्मॉलकॅप फर्म इंटरनॅशनल कन्व्हेयर्स  (International Conveyors Limited - ICL) त्यांच्या भागधारकांना 100% डिव्हिडेंड देणार आहे. यासाठी कंपनीने 23 सप्टेंबर 2022 ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे. औद्योगिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलेल्या या स्मॉलकॅप कंपनीची मार्केट कॅप 425 कोटी रुपये आहे. 1978 मध्ये इंटरनॅशनल कन्व्हेयर्स लिमिटेड (ICL) विणलेल्या फॅब्रिकपासून बनवलेले पीवीसी इंप्रेगनेटेड आणि पीवीसी कोटेड फायर रिटार्डंट, अँटी स्टॅटिक कन्वेयर बेल्टिंगचे उत्पादन आणि विक्री करते. आयसीएल सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची PVC सॉलिड बेल्टिंग उत्पादक आहे आणि तिच्या उत्पादनाचे 90 टक्के निर्यात करते.

किती डिव्हिडेंड देणार ?

कंपनीच्या संचालक मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअर्सवर प्रति शेअर 1 रुपये म्हणजेच 100% डिव्हिडेंड देण्याची शिफारस केल्याचे कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. मात्र, त्यासाठी येत्या एजीएममध्ये मंजुरी घ्यावी लागणार आहे. कंपनीचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक शनिवार, 24 सप्टेंबर 2022 रोजी बंद राहील. यासाठीच कंपनीची 49 वी एजीएम 30 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. डिव्हिडेंडची रेकॉर्ड तारीख शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 अशी निश्चित करण्यात आली आहे.

10 वर्षात 308% परतावा

इंटरनॅशनल कन्व्हेयर्स लिमिटेडचे (International Conveyors Limited - ICL) शेअर्स एका दिवसापूर्वी म्हणजे 15 सप्टेंबर 2022 रोजी थोड्या घसरणीसह 63.25 रुपयांवर बंद झाले. पण, या शेअरने गेल्या 10 वर्षात 308.09 टक्के आणि गेल्या पाच वर्षात 162.71 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरने 111.58 टक्के परतावा दिला आहे, पण गेल्या वर्षात हे शेअर्स 14 टक्क्यांनी घसरले आहे. या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये हा शेअर 12 टक्क्यांनी घसरला आहे.

जून 2022 अखेर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग 66.33 टक्के होती, जी थर्मॅक्स, जीएमएम फॉडलर, प्राझ इंडस्ट्रीज आणि बीईएमएल या स्पर्धकांपेक्षा जास्त आहे.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT