अर्थविश्व

तुमचे सेव्हिंग्स अकाऊंट एकापेक्षा जास्त आहेत ? होतील 5 मोठे नुकसान

सुमित बागुल

Disadvantage of multiple savings account: सर्वसाधारण एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त सेव्हिंग्स अकाउंट (Multiple savings account) असतात. अनेकदा तर नोकरी बदलल्याने किंवा शहर बदलल्यामुळे बँकही बदलते. आधीच्या सेव्हिंग्स अकाउंटसोबत आपण नवे अकाउंटही सुरु करतो. एकापेक्षा जास्त अकाउंटचे फायदे आहेत. ज्यात, कुठे कमी तर कुठे जास्त व्याज, फ्री ATM ट्रान्झॅक्शनच्या जास्त सुविधा, एकापेक्षा जास्त चेकबूक यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे याचे काही नुकसानही आहेत, जाणून घेऊया 5 मोठ्या नुकसानांबाबत...

मिनिमम बॅलेन्स ठेवणे आवश्यक
एकापेक्षा जास्त सेव्हिंग्स अकाउंट सुरु करणे सोपे आहे, कठिण आहे ते अकाउंटमधील मिनिमम मंथली एव्हरेज बॅलेन्स कायम ठेवणे. ज्या अकाउंटचा तुम्ही कमीत कमी वापर करता, त्यातही मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागतो. असे न केल्यास तुम्हाला दंड बसू शकतो.

व्याजाचेही नुकसान
एकापेक्षा जास्त सेव्हिंग्स अकाउंटमध्ये पैसे ठेवल्यामुळे व्याजाचेही नुकसान होते. कारण एकाच अकाउंटमध्ये जास्त पैसे ठेवल्यास व्याजही जास्त मिळते. त्यामुळेच एकापेक्षा जास्त बँकेत विभागून पैसे ठेवल्यास व्याज कमी मिळते.

ऑटो ट्रान्सफरसाठी अडचणी
एकापेक्षा जास्त सेव्हिंग्स अकाउंट असल्यास ऑटो ट्रान्सफरबाबत अडचणी येऊ शकतात. जर सगळे डिपॉझिट एका पे-चेकने करत असाल तर ऑटो ट्रान्सफरचा पर्याय कठिण होऊ शकतो. सगळे अकाउंट्स आणि त्यातील डिपॉझिट अमाउंटला ट्रॅक करणे कठिण काम होऊन बसेल.

जास्त फी आणि चार्जेस
काही बँकांमध्ये कमी शिल्लक (Low balance) असल्यास जास्त शुल्क (fee) आकारले जाते. त्यामुळेच एकापेक्षा जास्त सेव्हिंग्स अकाउंट ठेवण्याचा किती फायदा याचा मागोवा घ्या. दुसरीकडे अनेक बँका ग्राहकांकडून वार्षिक देखभाल शुल्क आणि सेवा शुल्क (maintainance fees and service charge) आकारतात. त्यामुळे तुमचे दोन अकाउंट्स असतील तर दोन्ही ठिकाणी शुल्क भरावे लागेल.

बँक खात्यात व्यवहार न केल्यास निष्क्रीय खात्याची समस्या
तुम्ही दिर्घ काळासाठी खात्यातून व्यवहार केला नाही तर ते खाते निष्क्रिय खात्याच्या श्रेणीमध्ये जाते, मग याला पुन्हा सक्रीय करावे लागते ज्याची मोठी प्रक्रिया आहे.
सेव्हिंग्सत अकाउंटचे उद्देश्य नेमके काय ? लोकांनी पैसे बचत करावे हा महत्त्वाचा भाग आहे. खाते सुरु करताना व्याज दर, बँकिंग सर्विस आणि इतर फायद्यांच्या बाबतीत नक्की जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT