SBI icici hdfc 
अर्थविश्व

SBI, HDFC Bank, ICICI बँकेत अकाउंट आहे का? OTP मिळण्यास येऊ शकते अडचण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - टेलकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने शुक्रवारी 40 डिफॉल्टर संस्थांची यादी काढली आहे. या संस्थांना सातत्यानं समज दिल्यानंतरही बल्क एसएमसच्या गाइडलाइन्सचं पालन संबंधित संस्थांकडून करण्यात आलेलं नाही. यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय, आय़सीआयसी आणि एचडीएफसी बँकांचा समावेश आहे. याशिवाय कोटक महिंद्रा बँक आणि एलआयसीलासुद्धा ट्रायलने इशारा दिला आहे. ट्रायने संबंधित बँकांना सात दिवसांचा कालावधी देताना 31 मार्च 2021 पर्यंत सर्व नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. असं न झाल्यास त्यांच्या ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये अडचणी येतील असंही स्पष्ट केलं आहे. यामध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या ओटीपी सेवेचाही समावेश आहे. 

ट्रायने सांगितलं की, टेलि मार्केटिंग कंपन्यांसह बँकांना आणि संस्थांना नियम लागू करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी योग्य तितका वेळ दिला आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाही. यामुळेच वेळ वाढवून दिला होता. आता एक एप्रिलपासून मेसेज पाठवण्यासाठी असलेल्या नियमांचे पालन झाले नाही तर 1 एप्रिलपासून त्यांच्या सेवा अखंडीत सुरु राहणार नाहीत. 

ट्रायच्या नियमानुसार, कमर्शियल टेक्स मेसेज पाठवणाऱ्या संस्थांना मेसेज हेडर आणि टेम्प्लेटची टेलिकॉम कंपन्यांकडे नोंदणी करावी लागेल. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीच्या नियमानुसार जर स्क्रबिंग प्रोसेसमध्ये मेसेज फेल झाला तर ग्राहकांना जाणाऱ्या मेसेजमध्ये अडथळा येईल. कंपन्यांकडून किंवा ग्राहकांकडून पाठवण्यात येणारा मेसेजची देवाण घेवाण होणार नाही. परिणामी अनेक कामं खोळंबण्याची शक्यता आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत ट्रायच्या कमर्शियल मेसेज नियमांचा उद्देश हा फसवणूक रोखणं हा आहे. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांकडून एकत्र करण्यात आलेल्या स्क्रबिंग डेटाचे आणि रिपोर्टचे विश्लेषण केले आहे. त्याबाबत टेली मार्केटिंग आणि एग्रीगेटर्ससोबत दोनच दिवसांपूर्वी बैठकही पार पडली. 

ट्रायने म्हटलं आहे की, एसबीआय, एडचीएफसी, पीएनबी, अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा यांसारख्या मोठ्या बँका बल्क मेसेज बाबत नियमावलीचं पालन करत नाहीत. यामध्ये कंटेंट टेम्प्लेट आयडी, PE आयडी यांचा समावेश आहे. जर ग्राहकांकडून काही ऑनलाइन व्यवहार होणार असतील तर त्यांना ओटीपी मिळणार नाही. कारण स्क्रबिंग प्रोसेसमध्ये या बँकांचे ओटीपी मेसेज किंवा महत्त्वाचे मेसेज सिस्टिमकडून रिजेक्ट केले जातील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्स ने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

Raj Thackeray: कसली ही नामुष्की! मनसेचा मुंबईत सुपडा साफ पण या उमेदवारांना दिला दणका..वाचा कोणाला किती मतं मिळाली?

SCROLL FOR NEXT